कोरोना ….लागवण कि शिकवण ... ज्ञानेश्वर कानिटकर (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)
गेल्या साधारण ३~५ महिन्यामध्ये सगळ्या जगाला एकत्र आणणाऱ्या कोरोना विषयी तसा खूप काही लिहिल गेलय आणि अजूनही लिहिता येईल...
इथे 'एकत्र' हा शब्द किती महत्वाचा आहे बघा कारण असं कधी घडलय का...कि सगळे देश फक्त एका ध्येयासाठी लढत आहेत...
सगळे जग फक्त ६~१५ इंची 'frame' (mobile ते laptop) मधून एकमेकांच्या जवळ आलय..
प्रत्येक ठिकाणच्या Reality चा अनुभव virtually मिळतोय तेहि अगदी घर बसल्या.. जय हो VR world
अगदी ३ वर्षाच्या मुलापासून ते अगदी १०० पार माणसांपर्यंत 'कोरोना' हा जगात सगळ्यात जास्त माहित असणारा शब्द झाला आहे...
(आत्ता पर्यंत मला फक्त ‘अननस’ हा एकमेव शब्द माहीत होता जो मराठी आणि जर्मनमध्ये सारखाच उच्चारतात आणि दिसतो पण सारखा)
सुदैवाने अजूनपर्यंत कोरोनाच्या कळा सोसल्या नसल्या तरी त्याच्या झळा मात्र साधारण मार्चपासून लागायला लागल्या ... माझी बायको १३ मार्चला माझ्या सासऱ्यांच्या प्रथम वर्षश्राद्धला एका आठवड्यासाठी भारतात जाणार होती ...आणि तो खरंच 'Friday the 13th' झाला असता... आम्ही Indian Govt ची 'Travel advisory' follow करत होतो...९ मार्च ला जर्मनीच नाव त्यामध्ये आल...
म्हणजे साधारण ९६ तास अगोदर, ८ मार्च ते 10 मार्च मध्ये सगळं चित्र पालटून गेल...आणि त्यातच 'flights' cancel व्हायला सुरुवात झाली....
आम्ही दुसरे पर्याय शोधात होतो पण शेवटी तिचा 'न' जाण्याचा निर्णय अगदी बरोबर होता ...कारण जर ती भारतात गेली असती तर कदाचित आत्ता कुठे तिला यायला मिळाले असते ...
आता हे नशीब म्हणा किंवा तिच्या वडिलांचा Space'X' मधून दिलेला 'ham-radio' संदेश...असो… त्यांचे आशीर्वाद आम्हाला असेच सतत मिळत राहतीलच..
त्याच्या साधारण १ महिना अगोदर (फेब्रुवारी मध्ये), माझ्या आई-बाबांचा मे महिन्या मध्ये इकडे यायचा प्लॅन आम्ही निश्चित केला, विमानाची तिकीट पण काढली...त्यांचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे १९ मार्च ला submit झाली … त्या नंतर लगेचच भारतात 'lockdown' लागला... आणि...त्यांचे पासपोर्ट आजहि (११ जून २०२०) मुंबईच्या जर्मन-कार्यालयात पडून आहेत ...
ह्या दोन महत्वाच्या अनुभवा नंतर सुरु झाला 'lockdown' चा काळ..तसा जर्मनी मध्ये तो असा कधी जाणवलाच नाही...कारण,
१. या लोकांना सामाजिक बांधिलकी असली तरी 'social distancing' हे लोक कायमच पाळतात
२. विलग्नवास ( Quarantine) तर आपण प्रत्येक रविवारी अनुभवतोच..
३. इथल्या लोकांना 'work from home' आणि 'work for home' म्हणजे घरकाम हे दोन्ही अगदी उत्तम जमते....
४. जर इथे 'थाळी बजाओ' सारखं काही करायचे असत तर कदाचित 'Squash-a-Beer' वगैरे काहीतरी झाले असते...त्याने नुसता आवाजच नाही, तर अल्कोहोल सगळीकडे पसरून कदाचित...कोरोना रुपी 'Germ'नी ला 'Beer' नी मारला असता..
आणि हो मुळात 'थाळी बजाओ' ह्याला माझा विरोध नव्हता बरं, कारण मला वाटतंय किमोदी आणि 'Company' ला कदाचित 'Lockdown' लोक पाळतील का हेच बघायचं असेल...
५. मास्क घालून काय किंवा न घालून काय इथे बऱ्याच लोकांना फरक पडेल असा वाटत नाही..कारण मुळात इथली बरेच लोक मितभाषी आहेत.....
मधल्या काळात खूप काही घडून गेले ..पाककला / चित्रकला / संगीत सारख्ये अनेक विविध कलाविष्कार Whatsapp ani FB च्या रूपात आपण प्रत्येकाने अनुभवलेच...
पण तरीही इथे राहून आणि आपल्या भारताची एकूण परिस्थिती बघून गेल्या जवळपास ३ महिन्यात खूप काही शिकायला मिळाले...
१३० अब्ज लोक सांभाळायची, पूर्ण देश बंद करून ठेवायचा तेहि खूप तुटपुंजी सरकारी / वैद्यकीय व्यवस्था असताना...म्हणजे खरंच चेष्टा नाही...मान्य आहे मला कि साधारण ५-१० टक्के लोकांना खूप काही सहन करावं लागलाय आणि अजूनही करतायत...'Lockdown' साठी एक कविता मी केली होती,
विषय : उनके लिए क्या है Corona...
For workers
जिनके लिए हररोज का है मरना...
उनके लिए क्या है Corona...
For farmers
जो हररोज बहाए दुसरो के लिए पसिना...
उनके लिए क्या है Corona...
For old age people
जिनको दिखे सिफ्र घर का एक कोना...
उनके लिए क्या है Corona...
For doctors
जो नजदिकसे देखे हररोज का बिछडना..
उनके लिए क्या है Corona...
For patients
जिनको हररोज मुष्किल है सोना...
उनके लिए क्या है Corona...
For soldiers/police man..
जिनका काम है खतरोसे खेलना...
उनके लिए क्या है Corona...
जिनको है खाली खाना पिना और सोना..
उनको बोलो Corona से डरोना..
सिफ्र तूम अपने घरमे रहोना..
सिफ्र तूम अपने घरमे रहोना..
असं म्हणतात कि कठीण काळ माणसाला खूप काही शिकवून जातो...आत्मनिर्भर कस व्हावं ह्याच पुस्तक-बाह्य ज्ञान आपल्याला गेला काही काळ आपोपच शिकवून गेलाय....कदाचीत ह्याचा चांगला परिमाण आपल्या पुढच्या पिढीला निश्चित होईल आणि जे माझ्या पहिल्या वाक्यात आहे हि एक लागवण नसून शिकवण म्हणून अंगी बाळगली तर मानवाचा स्वभाव भौतिक न होता नैसर्गिकरित्या ( naturally) चांगला होईल होईल..अशी अपेक्षा करतो... आणि माझे छोटेसे मनोगत संपवतो...
जय हिंद जय महाराष्ट्र…
ज्ञानेश्वर कानिटकर
स्टुटगार्ट, जर्मनी
kanitkarksunil@gmail.com