जर्मनीतले लॉकडाऊनचे अनुभव - अनघा दातार (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

२०२० साल एकदमच  हॅपानिंग सुरु झाले. साधारण मार्च पासून जर्मनी मध्ये लॉकडाऊन सुरु झाले. प्रथम हे सगळे फक्त चायना मध्येच आहे ...आपल्याकडे काय प्रॉब्लेम नाही अश्या भ्रमात होतो पण लवकरच प्रॉब्लेम चा आवाका लक्षात आला. रोज नवीन रुल्स ,रोज नवीन वाढणारे आजारी लोकांचे आकडे यामुळे थोडे थोडे टेंन्शन वाढत होते. त्यातच रोज आता घरून काम करायची ऑर्डर कंपनी कडून आली , जिम बंद झाली . एका वेळी दोन च लोक एकत्र बाहेर जाऊ शकत होते. अश्या सगळ्या बदलांबरोबर सवय करून घ्यायला जरा वेळ लागला पण लवकरच या सगळ्याला मी सरावले आणि आता यातून काय मार्ग काढता येईल याचा विचार करू लागले.

नशीबाने जर्मनीत लॉकडाऊन फार  स्ट्रीक्ट नसल्यामुळे बाहेर जाऊ शकत होतो. इतर काही देशांसारखी वाईट परीस्थीती नसल्यामुळे हा लॉकडाऊन तसा सुसह्य होता.

प्रथम मी जिम बंद असल्यामुळे व्यायामाचा विचार केला. मग दररोज १० किलोमीटर तरी चालायचे असे ठरवले. आणि त्याप्रमाणे एक वॊक दुपारी जेवण झाल्यावर आणि एक वॊक संध्याकाळी ऑफिस संपल्यावर . असे करून रोजचे व्यायामाचे रुटीन जमवले. कधी एकटी तरी कधी संध्याकाळी एका मैत्रिणी बरोबर असे चालायचे रुटीन ठेवले .  दर शनिवारी एका मैत्रिणी बरोबर हैडेलबेर्ग आणि आजूबाजूच्या परिसरातील मस्त हाईक्स रूट शोधून तिकडे हाइकिंगला जायला सुरवात केली.  जर हा व्हायरस प्रॉब्लेम नसता तर माझ्या जवळचे इतके छान रूट्स सापडलेच नसते.

नेहमीचे सोशलाईझिंग इव्हेंट्स नसल्यामुळे बऱ्याच संध्याकाळ फ्री मिळायला लागल्या. पण मित्र मैत्रिणीनीना भेटता येत नसल्यामुळे मग स्काईप कॉल वर मैफिली करायच्या ठरल्या. जवळ जवळ प्रत्येक वीकेण्डला कुठल्या तरी ग्रुप बरोबर ऑनलाईन वाईन पार्टी, कुकिंग  असे प्रोग्रॅम सुरु झाले .  एकत्र ऑनलाईन कुकींग ला तर खूपच मजा आली . सगळ्यांना एकच सेम रेसिपी देऊन ठरलेल्या वेळेला स्काईप कॉल वर येऊन मस्त गप्पा गोष्टी करत कुकींग आणि मग एकत्र ऑनलाईन जेवणे . मस्त धमाल आली .

ऑफिस तर चालूच होते . कधी घरून काम तर कधी ऑफिस मध्ये जाऊन . पण एक गोष्ट कटाक्षाने पाळली  ती म्हणजे घरून जरी काम करत असेन तरी ऑफिसला जाताना जसे नीट आवरून जाऊ तसेच घरी पण व्यवस्थित नीट आवरून कामाला बसत असे.

अजून एक मस्त गोष्ट या लॉकडाऊन मुळे झाली ती  म्हणजे मी लाईव्ह  इंस्टाग्राम वर माझ्या  meeTup ग्रुप साठी ऑनलाईन बॉलिवूड डान्स वर्कआउट सेशन सुरु करू शकले. गेले २-३- वर्ष हे चालू करायचे डोक्यात होते पण काही ना काही कारणाने जमत नव्हतं ते अचानक सुरु करता आले. एका मित्राने त्याच्या फिजीओथेरॅपी  प्रॅक्सिस  मधली एक खोली दर रविवारी वापरायला दिली आणि अनेक दिवसांपासून चा प्लॅन प्रत्यक्षात उतरला.

या लॉकडाऊनने बऱ्याच पॉझिटिव्ह  गोष्टी मला दिल्या. बरीच क्रिएटिव्हिटी वाढवली. माझ्या जवळच्या , आजूबाजूच्या परिसरातील सुंदर गोष्टी शोधायला मदत केली ,  आणी आत्तापर्यंत  मिळालेल्या फ्रीडमचं महत्व कळलं जे या आधी कधीच जाणवलं नव्हतं.

पण अर्थातच मी आता लॉन्ग डिस्टन्स ट्रॅव्हलींग आणि फेस टु फेस पार्टीज  नक्कीच मिस करतीयेपण लवकरच सगळं काही आधीसारख सुरु होईल अशी आशा करतेय.

अनघा दातार,
हैडेलबेर्ग, जर्मनी
(anagha.datar@gmail.com)
http://thats-my-mind.blogspot.com/