मराठी कट्टा जर्मनी
जर्मनीमध्ये उन्हाळ्याची खरी सुरुवात जुलै वगैरे मध्ये होते. मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागतात, रस्ते रिकामे होतात, जर्मन सरकार विविध कामं काढायच्या नावाखाली सगळं शहर खोदून ठेवते, ऑफिसमध्ये कोणाला कामाचा मूड नसतो कारण अर्धं ऑफिस समर हॉलिडेवर असतं. आपणही एखाद्या समर ट्रिपची तयारी सुरू करतो. मग असंच एखाद्या जुलै महिन्याच्या रविवारच्या दुपारी आपण मस्त जेवून, परदे वगैरे ओढुन घेऊन, फॅन लावून लोळत एखादं पुस्तक वाचत पडलो असताना, अचानक अजितचा फोन येतो. आपल्याला कल्पना असते की फोन कशाबद्दल आहे, आपल्याला तो विषय आत्ता अगदी बोलायचा नसतो, डोळ्यांवर कुंभकर्णाला हेवा वाटायला लावणारी गुंगी आलेली असते. पण विषयाचं महत्त्व आपल्यालाही माहीत असतं. मग आपण स्वतःलाच शिव्या घालत कॉल घेतो. तिकडून आवाज येतो - "अरे गणपती एक महिन्यावर आलेत, आपला हॉल अजून बुक नाहीये. कॉल घ्यायला हवा.." वगैरे वगैरे वगैरे. आपण फोन ठेवतो. झोप उडालेली असतेच. मग आपण उट्ट काढायला बाकी टीमला फोन करतो आणि त्यांची पण झोप उडवतो. संध्याकाळी टीमचा कॉल होतो. गणपतीच्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवल्या जाते .
आता या वर विषद केलेल्या भूमिकेत कधी मी असतो, कधी साकेत, कधी मुग्धा, तर कधी अजून कोणी. आता आम्ही आहोत, आधी अजून कोणीतरी असायचं. पण वर्षानुवर्ष सिच्युएशन साधारण अशीच असते. मग घाई घाईत पुढच्या आठवड्यात हॉलची visit ठरते. देशपांडे काका, अजित आणि टीममध्ये जमेल ती लोक हॉल बघून येतात. आपापल्या दिव्य जर्मन मध्ये आम्ही हॉलच्या हाऊसमाईस्टरला कार्यक्रम समजावून सांगतो. खुर्च्या कुठे हव्या, टेबल कुठे हवीत, जेवायची व्यवस्था कुठे करायची, साऊंड सिस्टीम कशी लावायची, माईक किती हवे वगैरे वगैरे आम्ही मागण्या टाकत जातो. तो त्याच्या जर्मन स्वभावाला जागून हे मला माहीत नाही, ते तुम्हाला ऑफिसला विचारावं लागेल, इथे आम्हाला पावर नाय, तिथे फायर एक्झीट असल्यामुळे तुम्ही कागदाचा चिटोरा सुद्धा ठेवू शकत नाही वगैरे वगैरे त्यांच्याकडची अस्त्र सोडत जातो. मग आमच्यातला त्यातल्या त्यात बरा जर्मन बोलणारा, त्याला थोडा मस्का लावत, थोडं हे हवंच आहे, ते नसलं तरी चालेल, अशी तडजोड करत, फायनल तोड पाणी करतो. तरीही कार्यक्रमाच्या दिवशी यातल्या अर्ध्या गोष्टी त्याने आपल्या मनाला येईल तश्या बदलल्या असतील याची आपल्याला खात्री असतेच पण तरीही त्याक्षणी काम झाल्याच्या आनंदात आम्ही असतो.
आपल्याला वाटेल की झालं संपलं. पण नाही ही तर सुरुवात असते. हळू हळू चढायला लागतो गणेशोत्सवाचा ज्वर. सांस्कृतिक कार्यक्रम कुठले करायचे. समान कुठून गोळा करायचं. कार्यक्रमाची मार्केटिंग कशी करायची. महाप्रसादाचे काय... कामांची लिस्ट बनायला सुरुवात होते.
दरवर्षी एखाद दुसरा वॉलेंटीयर गळून पडतो तर दोन चार नवीन कार्यकर्ते जॉईन होतात. यातून नेमक्या माणसाला हेरून त्याच्या स्वभावाला साजेसं काम देणं हे पण एक टास्क असतं.
दिवसाचे दोन तास रोज सतत नुसते कॉल्स. त्यात कधी चिडचिड, कधी रुसवे फुगवे. सगळं निभावून नेत पुढे जात जायचं.
गणपतीचा महाप्रसाद. याबद्दल तर एक वेगळा लेख लिहिता येईल एवढं मोठं काम असतं ते.
२०१५-१६ पासून आपण फ्रँकफर्टमध्ये कट्ट्याचा गणपती मोठ्या प्रमाणावर बसवायला सुरुवात केली. त्याला येणारे लोक हे वाढता वाढता वाढे या गुणोत्तराने दरवर्षी वाढत चालले आहेत. गणपती बसवताना इथे टीम कडून एक गोष्ट सुरुवातीपासून कटाक्षाने पाळली गेली की या कार्यक्रमाचा कमर्शियल इव्हेंट करायचा नाही. महाराष्ट्राला गणेशोत्सवाची मोठी सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा आहे. ती परंपरा या जर्मन मुलुखात आपल्याला जमेल तशी पुढे न्यायचा आपल्या परीने प्रयत्न करायचा. त्यामुळे सुरुवातीपासूनच गणपतीचा महाप्रसाद अर्थात जेवण हे कट्ट्याचे कार्यकर्ते स्वतःच बनवतात.
सुरुवात शंभर दीडशे लोकांसाठी महाप्रसाद बनवण्याने झाली ती आता साडे चारशे ते पाचशे लोकांसाठी हा महाप्रसाद तयार करण्यापर्यंत गेलेली आहे. या कामाची सुरुवात होते ती एवढ्या लोकांचा स्वयंपाक करायला जागा शोधण्यापासून. मग कधी मंदिर, तर कधी कट्ट्याच्या कार्यकर्त्याचे रेस्टॉरंट. त्या पुढचा टप्पा एवढ्या लोकांसाठी जेवण बनवायला लागणाऱ्या अजस्त्र भांड्यांची जुळवा जुळव. सगळ्या सामानाची लिस्ट, त्यानुसार खरेदी. दुसरीकडे रजिस्ट्रेशन वर सतत लक्ष. बजेट मध्ये बसतंय ना याची सतत काळजी. मग एखाद्या पदार्थासाठी स्पॉन्सर शोधणे. कामं संपायचं नाव घेत नाहीत . साइड बाय साईड स्वयंपाक करणाऱ्या कार्यकर्त्यांची टीम तयार करणे. मग हे कार्यकर्ते एक दिवस आधीच रात्री जमणार, रात्रभर कच्ची तयारी करून , दोन अडीच तास झोपून परत सकाळी चारला उठून स्वयंपाकाला तयार.
इथे हॉलवर हाऊस माईस्टरने नेहमीप्रमाणे माती खाऊन काहीतरी अरेंजमेंट बदललेली असते. त्याच्याशी जुळवून घेत, गोड बोलून चार पैकी दोन गोष्टी त्याच्याशी करवून घेण्यात आपण यशस्वी होतो.
कार्यक्रमाची सुरुवात होते. एक एक करून लोक यायला लागतात. गाणी, नाच, ढोल ताशे, लेझिम, गणपतीच्या नावाचा गजर. महिनाभर आपण ज्याच्या आगमनाच्या तयारीत असतो तो गणराय कट्ट्यावर प्रतिष्ठापित होतो. हे स्टेज वर सुरू असताना कट्ट्याचा कार्यकर्ता मात्र हजार प्रकारच्या आगी विझवण्यात बिझी असतो. एखाद्या परफॉर्मरच्या मनासारखी व्यवस्था नसते. तर कोणाला ऑन द स्पॉट दहा लोकांसाठी रजिस्टर करायचं असतं. कधी प्रसाद वेळेवर येण्यात विघ्न येतात. तर कधी स्टेजवर टेक्निकल प्रॉब्लेम. येणाऱ्या लोकांना यातल्या कुठल्याही प्रॉब्लेम्सची कल्पना येऊ नये याची काळजी घेत सतत हसतमुखाने इथून तिथे धावपळ करताना मग एका क्षणी आपल्या मनात विचार येतो, कशाला करायचे एवढे कष्ट. पुढच्या वर्षी आपण असंच बाकीच्या साडे चारशे लोकांसारखं रजिस्टर करून कार्यक्रमाला यायचं आणि एन्जॉय करायचं. कोणी सांगितलं ह्या लष्कराच्या भाकऱ्या भाजायला. मला वाटतं हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात दर कार्यक्रमाच्या वेळेस एकदा तरी येतंच येतं.
का करतो आपण हे? मी हा प्रश्न स्वतः ला बरेचदा विचारलाय. आणि मला त्याचं सापडलेलं उत्तर म्हणजे न करता स्वस्थ बसणं आपल्याला जमणार नाही म्हणून. As simple as that. आमचे देशपांडे काका आहेत. वय पंचाहत्तरीच्या पुढे. दरवर्षी कार्यक्रमानंतर आमच्यावर रागवतात, तुम्ही सगळे खूप गोंधळ घालता, मी यापुढे यात काडी मात्र लक्ष घालणार नाहीये. पुढच्या वर्षी तुम्ही तुमचं बघून घ्या. हे त्यांनी आम्हाला सांगायचं किमान पाचवं/सहावं वर्ष असेल. पुढच्या वर्षी काका परत त्याच जोमाने कॉल करून आम्हाला झापणार. "अरे काय करताय तुम्ही? अजून कार्यक्रमाचा हॉल पण बुक नाही केलाय."
आमच्यातला कार्यकर्ता शांत बसत नाही, बसू शकत नाही.
शेवटी, भगवंत, त्याची पूजा, त्याला जोडून येणारी भाविकांची श्रद्धा तर आहेच, पण त्याचबरोबर आहे ती आपण भारतीयांची उत्सवप्रियता.
पु. ल. म्हणतात "शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी … वांग्याचे भरीत …गणपती बाप्पा मोरया ची मुक्त आरोळी.
केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण.…
मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी…दुस-याचा पाय चुकून
लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार… दिव्या दिव्या दिपत्कार…"
गणेशोत्सव तरी वेगळं काय आहे हो.
कार्यक्रम संपल्यावर एखादा/एखादी स्टूडेंट येतो आणि आवर्जून सांगतो की कट्ट्याच्या गणेशोत्सवामुळे घरच्या गणपती / गौरींची आठवण येऊन होमसिक वाटलं नाही. आपल्याला आपले विद्यार्थीदशेतले दिवस आठवतात आणि वाटतं याच साठी केला होता अट्टाहास.
कार्यक्रम संपून, सगळं आवरून, हॉल साफ करून, लोकांना आणि सामानाला त्यांच्या घरी सोडून, घरी पोचायला रात्र होते. बहुतेक वेळा गणेशोत्सवाचा कार्यक्रम वीकेंड बघून, शनिवार रविवारी असतो. तो शनिवारी असला की आपण मनाशी आराखडे बांधतो, चला आता या रविवारी तरी आपण अगदी मनसोक्त लोळत आपल्या आवडीचे पुस्तक वाचत/सिरीज,सिनेमा बघत श्रमपरिहार करणार. या प्लॅननुसार रविवारी जेवून बिवून, मस्त बडीशेप तोंडात टाकून, सगळे परदे बिर्दे ओढुन घेऊन अंधार करत जसं आपण आपलं आवडतं पुस्तक हातात घेतो, आपला फोन वाजतो आणि पलीकडून आवाज येतो - "अरे दिवाळी दोन महिन्यांवर आली आहे. आपण अजून हॉल बुक केलेला नाहीये. कसं होणार. लोकांना हलवलं पाहिजे... "
इंद्रनील पोळ
मराठी कट्टा कार्यकर्ता
इस्टमन कलर में....
The wait is finally over!!!
Registration for MKG's much awaited Diwali celebration - Bolly वाली दिवाली, starts now!
Games, Quizzes, Fun activities, Awards night, Gifts, Food, Drinks, and much more!!
Meet new people, network, socialize and most importantly have fun!!
Bolly वाली दिवाली - इस्टमन कलर में
When - 22nd October 2022, 3PM onwards
Entry Price -
Registered MKG Members - €12
Non-members - €16
Kids between 6-14 years - €12
Kids below 6 years - Free
Food is included in this fee.
Where -
Saalbau Volkshaus Enkheim
Borsigallee 40, 60388 Frankfurt am Main
Registration Link - https://www.tugoz.com/events/mkgmembership/katta-diwali-party-2022
For any queries, contact -
Indraneel - +4915164302127
Saket - +4915754644947
🙏🏻🙏🏻गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻🐀🐀
Wait is finally over
रविवार दिनांक २४ सप्टेंबर  रोजी आपण मराठी कट्टा जर्मनीचा स्थापनेपासूनचा दहावा गणेशोत्सव साजरा करणार आहोत .
पुण्यातील प्रसिद्ध रमणबाग ढोल पथक ढोल,ताशा आणि झांज  ह्यासहित फ्रँकफर्ट मध्ये  धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येत आहे .
ह्याचबरोबर, ह्या वर्षीचा उत्सव आपण हिंदुस्थानाचा पहिला सार्वजनिक गणपती "श्रीमंत भाऊसाहेब रंगारी" गणपती बरोबर एकत्र येऊन साजरा करत आहोत, ते पण माननीय Dr. अमित तेलंग Consul General of India, Frankfurt ह्यांसोबत, सोबतच बाप्पाची पुजा, आरती,अथर्वशीर्ष, ढोल-ताशा वादन आणि अर्थातच मराठमोळं जेवणं !!
आणि हो, ह्यावर्षीचे अजून एक प्रमुख आकर्षण - मराठी कट्टा घेऊन येत आहे जर्मनी मध्ये पहिल्यांदा मल्लखांबाचे प्रात्यक्षिक. तर बघायला तयार आहेत ना.
📣📣 Location
Saalbau Volkshaus Sossenheim,Siegener Str. 22 Frankfurt 65936
📣📣 Entry
Free for kids below 8 years
15 Euro (everyone above 8 years)
📣📣 Registration
https://www.tugoz.com/events/mkgmembership/katta-ganapati-2023
Or scan QR code from the flyer
Please Note:
This event is organized for Marathi Katta Germany friends and families .
Marathi Katta Germany e.V.
मराठी कट्टा जर्मनी
।। माय मराठी आमुच्या ध्यानीमनी ।।
www.marathikattagermany.com
Any question? reach out to
1. Indraneel Pole - +4915164302127
2. Shantanu Sardesai - +4915174615361
येताय ना ?? वाट बघतो आहे.
बोला गणपती बाप्पा  मोरया !
मराठी कट्टा जर्मनी
।। माय मराठी आमुच्या ध्यानीमनी ।।
मराठी कट्टा शाळेच्या मुला-मुलींनी शाळेत तयार केलेले काही कॉमिक्स सादर करत आहोत तुमच्या समोर -
शाळेच्या विद्यार्थ्यांनी कॉमिक्स द्वारे सांगितलेली गोष्ट
मृण्मय ने "झूम इन" करत करत काढलेले चित्र
मराठी कट्टा जर्मनीच्या शाळेबद्दल तुम्ही या लिंकवर अधिक जाणून घेऊ शकता -
https://marathikattagermany.com/school
नमस्कार मंडळी,
मराठी कट्टा जर्मनीच्या टीम कडून आपण सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. २०२० हे वर्ष बऱ्याच कारणांनी आपण सर्वांसाठीच वेगळं आणि आव्हानात्मक होतं. मराठी कट्ट्यासाठी सुद्धा हे वर्ष बऱ्याच आव्हानांनी भरलेलं होतं. असं असलं तरीही मराठी कट्ट्याने या परिस्थितीवर मात करत,यावर्षी विविध नवीन कल्पना राबवण्याचा प्रयत्न केला तसंच जर्मनीतल्या मराठी मंडळींसाठी सर्वप्रकारे एक भक्कम आधार म्हणून मराठी कट्टा जर्मनी ही संस्था वेळोवेळी उभी राहिली. २०२० मधल्या मराठी कट्ट्याच्या विविध उपक्रमांचा एक छोटासा आढावा आम्ही या न्यूजलेटरद्वारे घेण्याचा प्रयत्न केला आहे. २०२१ मध्ये परत एकदा नवीन उत्साहासकट मराठी कट्टा जर्मनीची टीम नव-नवीन कार्यक्रम घेऊन लौकरच आपण सर्वांसमोर येईल. २०२१चे हे नवीन वर्ष आपण सर्वांसाठी सुखसमृद्धीचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे असो या शुभेच्छांसह...!
टीम मराठी कट्टा जर्मनी
वर्ष २००८, मे महिना, शाळेला सुट्टी! मस्त पैकी क्रिकेट खेळून, त्यानंतर आमरस ओरपून वामकुक्षीचा बेत होता. डोळ्यात झोप रेंगाळत असताना पु. ल. देशपांडे यांचे प्रवासवर्णनांचे पुस्तक हाती पडले. युद्धात राखरांगोळी झालेल्या बॉन शहराचे पुलंनी केलेले वर्णन वाचून कुतूहल चाळवले आणि मी पूर्ण पुस्तक वाचून संपवले. जर्मनी सोबत असलेल्या माझ्या आकर्षणाची ती फक्त सुरुवात होती!
२०११ साली जेव्हा मला जर्मनी ला जायची संधी मिळाली, तेव्हा स्वर्ग फक्त २ बोटे वर उरला होता. आयुष्यामध्ये त्याआधी फक्त एकदा विमानात बसलो होतो. आकाशाचा वेध घेणाऱ्या पक्षाचे चिन्ह असेलेले लुफ्थांसा चे विमान त्यामुळे मी कधीच विसरणार नाही. जर्मनी च्या उत्तरेला असलेले sankt पीटर ओर्डीन्ग या गावी मी माझी अ२ चा अभ्यासक्रम मी ५ देशातील विदयार्थ्यंसोबत पूर्ण केला. त्या २१ दिवसात आम्ही हॅम्बुर्ग शहराला २ वेळा भेट दिली. तेथील ४ ४ मजली शॉपिंग मॉल्स आणि हॅम्बुर्ग बंदर बघून थक्क झालो. जर्मन भाषेची गोडी निर्माण झाल्यामुळे मी पुढे शक्य असेल तेव्हा भाषा शिकायचा प्रयत्न केला.
कालौघात मी पुढे सनदी लेखापाल CA अभ्यासक्रम करून पुढे २ ३ वर्ष नोकरी केली. त्यानंतर मला परदेशात शिक्षणाचे वेध लागले होते. इतर बहुतेक सर्व ठिकाणी नकार मिळत असताना, जर्मनी मधील फ्रांकफुर्त स्कूल ऑफ फिनान्स या विद्यापीठाने माझ्याशी संपर्क साधला आणि भेटायला बोलावले. ज्या अभ्यासक्रमामध्ये मला स्वारस्य होते, त्यात मला प्रवेश बिलकुल मिळणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली, आणि दुसऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रयन्त करण्याचा सल्ला दिला. नशिबात बहुतेक हाच पत्ता लिहिला असल्यामुळे दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला. (बोचरा) स्पष्टवक्तेपणा हा जर्मन गुण त्या प्रसंगी प्रकर्षाने जाणवला. परत पुस्तकांवरची धूळ झटकत"इश्श बिन, दु बिस्ट" ची उजळणी चालू केली. सर्व सोपस्कार पूर्ण करून मी शेवटी ऑगस्ट २०१९ मध्ये माझ्या आवडीच्या देशात परत पाऊल ठेवले!
कामचलाऊ जर्मन येत असल्यामुळे मला थोडा अधिक आत्मविश्वास होता. फ्रांकफुर्त विमानतळावर टॅक्सी केली आणि त्यातील ड्राइवर "इंडीचे लॉयते, सेहर क्लूग" बोलत होता, ज्यात त्याने थोडा रस्ता चुकवला . ४९  युरो बिल झाले आणि पाकिटातून ५० युरो ची  नोट काढत असताना आपण"इंडीचे"(भारतीय) आहोत पण"क्लूग" (बुद्धिमान ) नाही याची तात्कळ जाणीव झाली! स्वतःच्या खोलीचा ताबा घेऊन मी कपडे वगरे लावले. माझ्या फ्लॅट मध्ये माझ्या सोबत अजून ८ लोक होती आणि माझ्या आधी फक्त एक मोरक्कन मुलगा आलेला होता, जो पुढे चा चांगला मित्र झाला. त्यामुळे इतर ७ कोण असणार याची मला प्रचंड उत्कंठा होती. एक एक करून विद्यार्थी येत होते. शेवटी आम्ही 4 भारतीय, १ मोरक्कन, एक पेरुव्हियन, १ इटालियन, १ जर्मन आणि १ चिनी असे एकूण ९ झालो.
मी स्वैपाकमध्ये यथातथाच, पण प्रयोगशील होतो किंवा आहे. जर्मनी मध्ये मी एकदा दोनदा पोळ्या करायचा प्रयन्त केला, पण तो पूर्ण फसला. पनीर करायचा प्रयत्न मात्र  यशस्वी झाला. कुकर च्या शिट्ट्यामुळे सोबतचे अभारतीय लोक सुरुवातीला कावरेबावरे व्हायचे. पण हळूहळू त्यांना सुद्धा सवय झाली. एकाच वेळेला ३ कुकर परिसर दणाणून सोडायचे. एका बाबतीत मात्र माझा अंदाज पूर्ण चुकला, ते म्हणजे दप्तरदिरंगाई! आमचा डिशवॉशर बदलायला २ महिने का लागले याचे उत्तर मला बहुतेक पुढच्याच जन्मात मिळेल. सुरुवातीचे १ २ महिने अभ्यासाचा फारसा ताण नसल्यामुळे मी सुरुवातीला स्वैपाक शिकण्याकढे आणि जर्मन शिकण्याकढे लक्ष दिले.
हळूहळू अभ्यासाचा ताण आणि इतर लोकांसोबत प्रोजेक्ट चे काम वाढायला लागले. आमच्या युनिव्हर्सिटी मधील वातावरण बरेच आंतरराष्ट्रीय आहे. इतर देशामधील लोकांसोबत काम करण्याची आणि वेगवेगळ्या इव्हेंट्स ला जायची मी कुठचीही संधी सोडली नाही. दक्षिण अमेरिकन, जर्मन, इतर युरोपियन, चिनी विद्यार्थी कशा प्रकारे विचार करतात त्यातून खूप शिकायला मिळते. त्यांची स्वयंशिस्त आणि चिकाटी मला माझ्या अंगात बाणवायला   नक्कीच आवडेल. विशेषतः चिनी जर्मन भाषा शिकण्यावर जी मेहनत आणि पैसे खर्च करतात ते बघून माझे डोळे दिपले. स्थानिक भाषेला आपण सतत दुय्यम स्थान देऊ नये असे माझे स्वतः चे मत आहे. जर्मन भाषेचे महत्व वर्कस्तूडेन्ट नोकरीचे अर्ज करताना खूप जाणवले. स्थानिक लोकांची विचारपद्धती समजण्यासाठी आणि एकूण समाजात मिसळण्यासाठी उत्तम जर्मन समजणे आणि बोलता येणे फार गरजेचे आहे. माझ्या युनिव्हर्सिटी मध्ये आम्हाला जर्मन शिकवतात आणि त्यांची पद्धत भारतीय शिक्षकांपेक्षा पुष्कळ वेगळी आहे. एकंदरीतच इकडे शिकवण्याची पद्धत भारतापेक्षा वेगळी आहे. वर्गातील छापील पुस्तक आणि प्रत्यक्ष कामाची सांगड घालत शिकवायची पद्धत मला खूप भावली. विध्यार्थ्यांच्या प्रश्नाचे निरसन करायचा ते पूर्ण प्रयत्न करतात. बहुतेक सर्व शिक्षकांनी आधी वेगवेगळ्या ठिकाणी उच्च पदावर काम केले असल्याचे प्रतिबिंब त्यांच्या शिकवण्या मध्ये नक्कीच पडते.
या सर्वांच्या मध्ये मी सतत नोकरीचे अर्ज करत होतो. महिन्याच्या शेवटी पगाराची सवय लागली असल्यामुळे मला लवकरात लवकर अर्धवेळ का होईना काम चालू करायचे होते. शेवटी ३० ४० ठिकाणी नकार आल्यानंतर मला डिसेंबर सुरुवातीला एका ठिकाणी होकार आला. माझे काम जानेवारी २०२० च्या शेवटाला चालू होणार होते. मी डिसेंबर महिन्यात भारतामध्ये परत आलो आणि जवळसपास एक महिना राहून जर्मनीला परतलो, आणि काम चालू केले. तेव्हा कोरोनाचे वादळ घोघावयाला सुरुवात झाली होती!
फेब्रुवारीच्या सुरवातीला कोणी खोकले की मान लगेच वळायची आणि खोकणाऱ्या माणसाचा शोध घ्यायला लागायची. नोकरी च्या ठिकाणी सुद्धा आम्ही पूर्ण काळजी घेऊ, तसेच तुम्ही घरी राहून काम करू शकता असा पर्याय दिला होता. काही भारतीय प्रसारमाध्यमांनी जर्मनीचे नाव घेऊन इटलीच्या बातम्या दिल्या आणि शेवटी त्यातील सत्य समजल्यानंतर आई बाबा शांत झाले. साधारण जून महिन्यापर्यंत कोरोना नियंत्रणामध्ये आलेला होता. आणि माझी उन्हाळयाची मे महिन्यानंतर चालू झाली. माझा जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्या मध्ये मी पूर्ण वेळ काम केले.
या तीन महिन्या मध्ये मी भरपूर फिरलो. हायडेलबर्ग या शहरापासून माझी फिरण्याची सुरुवात झाली. त्या नंतर मारबर्ग, फुलदा, कासेल, माइन्झ अशा अनेक ठिकाणी जाऊन आलो. एखादे चर्च, सुंदर राजवाडा, त्यामधील म्युसियम, नदी, कॅफे अशी साधारण माझी टुमदार जर्मन गावाची कल्पना आहे. जर्मनी सोबत मी बेल्जियम आणि फ्रान्स मध्ये सुद्धा फिरलो. जवळपास पाऊण तासाची"रिव्हर टूर" ची कल्पना मला अतिशय आवडली. या सर्व गावांमध्ये बहुतेक सर्व महत्वाच्या वास्तू नदीच्या काठावर असतात. 3 भाषांमध्ये (जर्मन, फ्रेंच, इंग्लिश) कुठचाही रटाळपणा येणार नाही याची काळजी घेत त्या त्या गावाचा इतिहास ऐकण्याची मजा आगळीवेगळी आहे.
सप्टेंबर च्या सुरुवातीला परत कॉलेज चालू झाले. सध्या कोरोनाची दुसरी लाट आहे आणि लॉक डाउन सुद्धा चालू झाले आहे. नाताळच्या आसपास हे लॉक डाउन संपलेले असेल अशी अपेक्षा आहे. जर्मनी आणि युरोप मध्ये मी फिरायची माझी खूप इच्छा आहे!
थंडीची चाहूल लागली अन मी जर्मनीत याच शुभमुहूर्तावर सीमोल्लंघन केलं.रोजची सकाळी 7.14 ची लोकल अन ते धकाधकीच वेळापत्रक थोडंस बाजूला सारून मी नव्या उमेदीने युरोपात  प्रवेश केला. अर्थातच Schengen व्हिसा असल्याने युरोप भ्रमंती चालू झाली .नव्याचे नऊ दिवस दिवस काही संपेना. आशिया, युरोप आणि नंतर थेट ऑस्ट्रेलिया पादाक्रांत केल्यानंतर माझी गाडी जरा रुळावर येऊ लागली.
जर्मनीने शिक्षण क्षेत्रात अनेक शतकांपासून विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. जर्मनीमधील विद्यापीठांचे ज्ञानदानाबरोबरच संशोधन हे एक महत्त्वाचे काम आहे. बहुतेक सर्व विद्यापीठांचा भर संशोधनावर असतो.  विद्यापीठे स्वतःच्या क्षमतेवर उत्पन्न मिळवून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात. विद्यापीठे व संशोधन संस्था या राष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. यामुळे जर्मनी केवळ उच्च गुणवत्तेची उत्पादने बनवण्यात अग्रेसर नसून जगाला तंत्रज्ञान पुरवण्यातही आघाडीवर आहे. तसेच उत्पादक देखील आपले उत्पादन सतत चांगल्या दर्जाचे आणि फायदेशीर कसे बनेल यावर सातत्याने संशोधन करत असतात.जर्मनीत प्रत्येकसाठी शिक्षणाची दारे अनेकोत्तम  आहेत .फरक इतकाच आहे तुमची आवड अन निवड. अगदी इथल्या माध्यमिक शाळेपासूनच याची पाळंमुळं रोवली गेलीत. सरसकट सगळ्यांचा कल हा फक्त डॉक्टर इंजिनिअर न होता स्वःताच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही परदेशातून जर्मनीत येता तेव्हासुद्धा तुमच्याकडे असंख्य पर्याय उपलब्ध असतात. या अतिशय शिस्तीत आणि नियोजनबद्ध बांधलेल्या कार्यात आपले योगदान द्यावयाचे असेल तर जर्मन भाषेचे कायदेशीर शिक्षण आवश्यक आहे.अगदी तांत्रिक (technical) जागा वगळल्या तर  बाकी सर्व ठिकाणी व्यवहार हा जर्मन भाषेतूनच चालतो.जर्मनीत तग धरण्यासाठी भाषा ही पहिली पायरी आहे. आजकाल  इंग्लिशमध्ये बऱ्याच ठिकाणी सर्रास संवाद होतात पण प्रथमतः पावलोपावली गरज पडणारी भाषा जी येणे गरजेचे नव्हे तर अनिवार्य आहे असं जाणवताच माझा ही जर्मन शाळेचा प्रवास Volksschule पासून सुरु झाला.
या कोर्सच वैशिष्ट्य अस की यात तुमची सुरुवात अगदी बेसिक जर्मन पासून होते.इथला माझा मजेशीर अनुभव म्हणजे मला जर्मन अगदी काहीच समजत नव्हतं पण इंग्लिश येतं आणि याचा नक्की फायदा होईल असा विचार करून मी हुशारीने एन्ट्री घेतली  पण पहिल्याच दिवशी माझ्या बॅच मध्ये एकालाही इंग्लिश चा गंध नव्हता हे उमगल्यावर मात्र चांगलाच हिरमोड झाला आणि मी विचारचक्रात अडकले ,ना त्यांचं एवढे वर्षात काही अडलं आणि ते तरीही जर्मनीत म्हणजेच परदेशी आले मग  फक्त आपल्याकडेच इंग्लिशचं इतक स्तोम  माजवलं आहे का? असो.सुरुवातीला हातवारे करत किंवा फक्त क्रियापद समजून (वाक्यरचनेचा घोळ तर स्वतःला समजला तरी भरपूर) आमच्या मैत्रीला सुरुवात झाली.माझ्या शाळेत अगदी साठ वर्षाच्या आजी सुद्धा अत्यंत हिरीरीने शिकत होत्या.या शाळेचा मुख्य उद्देश म्हणजे जर्मनीचा सखोल अभ्यास. थोडक्यात काय तर इतिहास,भूगोल, संस्कृती,राजनीती याची देवाणघेवाण. कारण प्रत्येक जण  एका वेगळ्या देशातून वेगळ्या संस्कृतीतून आले होते.प्रत्येकाचे अनुभव चालीरीती ही तेवढ्याच अवर्णनीय.शाळेत भूगोलातही  इतके निरनिराळे देश मला इतक्या बारकाईने कधी समजले नव्हते. यासोबतच माझा एक नवीन छंद सुरू झाला , रोज एका सोबत संवाद साधून मग घरी येऊन तो देश गुगल मॅप्स वर आणि त्या देशाची थोडी फार माहिती इंटरनेट वर  शोधायची.लहान लहान देश शोधतांना तर   अगदी  खजिना सापडल्यागत आनंद मला मिळत होता.आपल्या देशाबद्दल दुसऱ्या देशातील लोक इतक्या उत्कंठतेने माहिती घेतात त्यामुळे अगदी सहजरित्या मैत्री होत होती.इथल्या लोकांचा मला मोकळेपणा सर्वात अधिक भावला.जसं गुणगान गातील तसंच चुकाही बिनधास्त दाखवतील.एकदम रोखठोक. कसलाच अट्टहास अजिबात नाही. पाककृतीतील विविधता ही इथे एक वेगळाच अनुभव देऊन गेली. केक, बिस्कीट ,पावाचे विविध प्रकार असे अनेक  (आपल्या भाषेत फक्त गोडाचे/  मैद्याचे) पदार्थ कळले .आपलं अगदी साधं जेवण सुद्धा त्यांनी bisschen scharf म्हणत फस्त केलं तेव्हा यात तिखट /मिरची किती घातली होती हा माझ्यासाठी त्यादिवशी गहन प्रश्न होता.आधी जर्मन साठी टाळाटाळ करणारी मी नंतर मात्र कधी या सगळ्यात रममाण झाली हे  माझं मलाच उमगलं नाही.
या कोर्सचा एक मोठा फायदा म्हणजे  माझं circle थोडं मोठं झालं.वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेले अनेक जण जर्मन क्लास ने जोडलें गेले होते.नमूद करायचंच झालं तर अगदी नासा मध्ये पूर्वी कार्यरत असलेले एक शास्त्रज्ञ ते एक रशियन लेखिका.त्यांचे अनुभव ऐकतांना अजूनच मन समृद्ध होत होतं.अर्थातच तोपर्यंत समजेल इतकं जर्मन सगळ्यांना येत होतं.Volksschule मध्ये विविध भाषांचे कोर्स  आहेत.अगदी काही ठराविक शहरात तर हिंदी भाषेचे सुद्धा वर्ग भरतात. योगा पासून झुंबा पर्यंत इथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.काही technical कोर्सेस ही आहेत.माझी साठ वर्षाची मैत्रीण जेव्हा स्वतः केलेलं presentation सादर करत होती तेव्हा तिच्या डोळ्यातला तो आनंद बघून आम्हा सर्वांचं मन अगदीच भारावून गेले.किती तो सळसळता उत्साह आणि सतत नवीन शिकण्याची धडपड.हे सगळं होत असताना एक प्रकारचा बिनधास्तपणे वावरण्याचा आत्मविश्वास आमच्यात येत होता.आमच्याच नकळत आम्ही थोडा फार जर्मन बोलत होतो.विविध कार्यालयात एकट्याने काम निभावत होतो.अगदी नावाप्रमाणे या कोर्समूळे जर्मनीने आपल्यात सामावून घेण्यासाठी आम्हाला मदत केली.
जर्मनीत स्थायिक व्हायचा मानस असेल तर नक्कीच भाषा उपयोगी येते.महत्त्वाचे म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीपासूनच इथल्या सरकारने जर्मन PR आणि जर्मन पासपोर्टसाठी  काही भाषेच्या अटी लागू केल्या आहेत.काही जण विशेषतः पुणेकर भारतातून येतांनाच जर्मन शिकून येतात. त्यांना निश्चितच इथे आल्यानंतर जुळवून घेण्यासाठी सोपं जातं. कितीतरी भारतीय देखील स्वतः जर्मन शिकवतात याचा सर्वाधिक प्रत्यय मला लोकडाऊन मध्ये फेसबुकवर आला.
जर्मन भाषेचे अनेक कोर्सेस हे शासनाच्या अधिपत्याखाली येतात.त्यामुळेच सवलत दरात याचा लाभ घेता येतो .आजकाल ऑनलाइन ही मोठ्या प्रमाणात खूप कोर्सेस  आहेत.Hochschule म्हणजेच जर्मन युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा जर्मन भाषेचं पुढील शिक्षण मोठ्या प्रमाणात दिलं जातं. जे विद्यार्थी मास्टर्स साठी येतात त्यांनाही यासाठी सुविधा उपलब्ध आहेत.पहिल्यांदा मी या युनिव्हर्सिटीत गेले तेव्हा याची प्रचिती अजूनच आली.फक्त थोडा वेळ खर्च होतो. भाषेचा अट्टहास जरी असला तरी असंख्य पर्याय तुम्हाला खुणवत असतात.त्यामुळे आपसूकच तुमची पाऊले पुढचं शिखर पादाक्रांत करतात.थोडक्यात काय तर पाट्या न बदलता भाषा शिकवण्याचं तंत्र आणि मातृभाषेचा सार्थ अभिमान बाळगणं हा मंत्र आपण जर्मनीकडून नक्कीच शिकलं पाहिजे.
अपूर्वा वाणी-अमृतकर
फ्रँकफर्ट
जर्मनी म्हणले की शिस्तप्रिय, टेक्निकल क्षेत्रात अग्रगण्य, औद्योगिकीकरण आणि पर्यावरण यांचा समतोल राखणारा देशच म्हणायला पाहिजे. क्रिकेट क्षेत्रात यासारखे उत्तम उदाहरण माझ्या पाहण्यात आणि आठवणीत जे आहे ते म्हणजे  ग्लेन मॅकग्राथ. शिस्तीत एका लायनीत न चुकता एकापाठोपाठ एकाच लाईन आणि लेंथवर बॉल टाकण्याची क्षमता  याची होती जशी जर्मनीची आहे. जरा इकडे किंवा तिकडे नाही. परफेक्ट सरळ रेषेत.
तर अशा या जर्मनीमध्ये काम करण्याची आणि राहण्याची संधी मिळते आहे हे समजताच मी न विचार करिता ती स्वीकारली. लहानपणी शिकत असताना मला नेहमी जर्मन इंजिनिअरींग आणि मर्सिडीज गाड्या यांचे खूप कुतूहल होते. आता गेली अनेक वर्ष इथल्या इंजिनीअर्सबरोबर काम करून  ते कुतूहल नाहीसे झाले आहे आणि त्याची जागा आता कौतुक आणि अजुन नवीन काय करता येईल या प्रश्नाने घेतली आहे.
बहुतेक २००७ साल असावे. शरद ऋतू होता. त्या काळात निसर्ग एका आगळ्या वेगळ्या साजात नटलेला असतो. मंद गारवा आणि निसर्गाचे रंग यांचे एक अतिशय सुंदर वातावरण होते. अशा शरद ऋतूमध्ये मी एका कस्टमर मिटिंगसाठी माझ्या जर्मन कलीग बरोबर पोचलो, स्टार लोगोचा कंपनीमध्ये. सगळ्यात प्रथम जे मनाला स्ट्राइक झाले ते वेळेत मिटिंग सुरु होणे. आमचा कॉन्टॅक्ट, आमची सिस्टममध्ये एन्ट्री झाल्यावर पाच मिनिटे आधी आला. मिटिंग रूममध्ये जाताजाता कॉफी आणि पाणी घेऊन गेलो. मिटिंग सुरू झाली तेव्हा उगाचच इकडच्या तिकडच्या गप्पा वगैरे काही नाही. मुद्द्यावर बोलणे आणि मुद्द्यावरचे प्रश्न. शिकण्यासारखे असे होते की मुद्द्यावर राहून मिटिंग कशी करतात.  आता ही पद्धत अगदी भिनली आहे दैनंदिन व्यवहारात. इथल्या वेदर बद्दल अजून थोडे लिहायचे तर इथे चार ऋतू अगदी वेगळे वेगळे बघायला मिळतात. शरद ऋतू सुरू झाला की कपडय़ांचे थर वाढत जातात थंडी संपेपर्यंत. वसंत आला की थर कमी कमी होतात आणि उन्हाळ्यामध्ये एकदम “फ्री टू एअर”. प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग वेगळा दिसतो आणि त्याप्रमाणे लोकांच्या मनातील निसर्ग पण बदलत असतो. इथल्या रुटीनसाठी एक गाणे एकदम चपखल आहे “पतझड सावन बसंतबहार एक बरस के मौसम चार…”.
इथल्या सरकारी सिस्टमची गाठ पडली जेव्हा “Anmeldung” आणि वर्क परमिट फॉरमॅलिटीज करायच्या होत्या.  रीतसर अपॉइंटमेंट घेऊन आम्ही सगळे गेलो होतो “Stadt” ऑफिसमध्ये. एकेकाच्या फॉर्मॅलिटी चालू होत्या. माझ्या मुलाचा नंबर आला. त्यावेळी तो अगदी लहान होता. त्याच्या डॉक्युमेंट वर मला आणि बायकोला सही करायला सांगितले. एकदम माझा मुलगा म्हणाला “मी का नाही सही करायची. माझा फॉर्म आहे ना?”. हे ऐकून आमची ऑफिसर म्हणाली त्याला “तु कर सही”. हे ऐकून तो खूश झाला व त्याने त्याच्या पद्धतीने नाव लिहिले. मग आम्ही आई वडील म्हणून सही केली त्याच्या नावानंतर. त्या ऑफिसरने त्याचे खूप कौतुक केले आणि त्याला चॉकलेट बक्षीस म्हणून दिले. आमचे हसतखेळत काम झाले अगदी पंधरा मिनिटात. सिस्टम किती प्रबळ आहे याची ही प्रचिती होती.
एकदा आम्ही Königstrasse ला गेलो होतो. बरेच फिरून झाले आणि मग आम्हाला भूक लागली. गुगल मॅपवर एक इटालियन रेस्टॉरंट शोघले आणि तिथे पोहोचलो. शनिवार असल्याने गर्दी होती. आम्हाला अर्ध्या तासाचे वेटिंग होते. आम्ही रेस्टॉरंटबाहेर थोडे बाजूला जाऊन उभे राहिलो. मुलांना खूप कंटाळा आला होता आणि भूकही लागली होती. ती खूप त्रास देत होती. आमच्या बाजूला एक तरुण जर्मन जोडपे उभे होते. ते आमचा हा गोंधळ बघत होते. थोड्या वेळाने त्यांचा नंबर आला. त्यांनी आमच्याकडे बघून एकदम विचारले “तुम्हाला आधी जायचे आहे का? असे दिसत आहे की तुमच्या मुलांना खूप भूक लागली आहे.?”  आम्ही दोघेच आहोत आणि आम्ही अजून थांबू शकतो. मी म्हणालो “असू दे, तुमचा नंबर आहे ना.” पण त्यांनी परत म्हटले “तुम्ही जा आणि एन्जॉय करा.” आम्ही त्यांना धन्यवाद देऊन आत गेलो. जेवण यथासांग पार पडले. त्या दिवशी इथल्या लोकांची आत्मीयता आणि धीर हा इथे राहण्यासाठी आधार देऊन गेला.
एकूण मी बऱ्याच वेळा ऐकले होते की जर्मन लोक थोडे अलिप्तच असतात आणि बाहेरच्या लोकांना आपल्यात सामावून घेत नाहीत. पण मला वेगळा अनुभव आला. याचे कारण होते माझे कलिग. त्यांनी आमचे घर सेट करायला खूप मदत केली. मला घर बघायला मदत करण्यापासून ते फॅमिली आल्यावर घरात सगळ्या वस्तू आणेपर्यंत. कुठेच मला काही कमतरता पडू दिली नाही. आमच्या घराच्या आसपास कुठे काय मिळते, कुठे रेस्टॉरंट्स आहेत, कुठे स्टेशन आहे असे बरेच काही सांगितले आणि दाखवले. “Starting trouble” त्यामुळे आम्हाला जाणवलाच नाही. ते आज आमच्या एक्स्टेंडेड फॅमिली चा भाग झाले आहेत. आम्ही त्यांना दिवाळी आणि गणपतीला हमखास बोलावतो. मोदक आणि चकली त्यांना फार आवडतात. आम्हाला ते “Easter” आणि ख्रिसमसला बोलतात त्यांच्याकडे. अशी ही संस्कृतीची आदानप्रदान म्हणजे खरीखुरी “ग्लोबल सिटिझनशिप”.  (Global Citizenship)
चकली मोदक यावरून इथल्या कुझिन बद्दल पण बोलायला हवे. इथे पण खाण्याचे विविध प्रकार आहेत. सहज ते माहीत होत नाहीत. थोडी मेहनत करावी लागते. शाकाहारी पदार्थ आता खूप मिळतात. मला आठवते की काही वर्षांपूर्वी शाकाहारी पदार्थ हे शोधून मिळायचे नाहीत. फक्त ब्रेड आणि सॅलड एवढेच मिळायचे. पण अलीकडच्या काळात जसे खरेखुरे ग्लोबलायझेशन होते आहे तसे तसे व्हेजिटेरियन पदार्थ मेन्यूमध्ये आपली जागा वाढवत आहेत. ब्रेडवरून आठवले की इथे अनेक प्रकारचे ब्रेड आणि केक मिळतात. हे सगळे ब्रेड पौष्टिक असतात कारण त्यात सगळे नैसर्गिक पदार्थ वापरलेले असतात. चवी पण वेगळ्या असतात. आपण फक्त तोंडाची चव आणि मनातील रूढ असलेले विचार बदलून त्याचा आस्वाद घ्यायचा असतो.
मला जाणवले की या देशामध्ये अशी शिक्षण पद्धती प्रचलित आहे ज्यामुळे पालकांवर आणि विद्यार्थ्यांवर कसलेही दडपण नसते. प्रत्येकाच्या कुवतीनुसार तो पुढे जात असतो आणि स्वतःला चांगले आयुष्य जगण्यालायक बनवत असतो.
मी पुण्याचा असल्याकारणाने एक ऑब्झर्वेशन असे आहे. पुण्यातील पेठा आणि इथल्या “Berg’s” मध्ये रहात असलेल्या लोकांमध्ये खूप खूप साम्य आहे. चिक्कूपणा आणि “आम्हाला सगळे कळते” हा भाव इथे पण बघायला मिळतो. दुनिया गोल आहे हेच खरे आहे.
तर असे बरेच किस्से, गोष्टी, विचार आहेत. लिहायला वेळ आणि शब्द कमी आहेत. पण एवढे नक्की आहे, हा एक समृद्ध देश आहे, इथे प्रत्येक माणसाला महत्त्व आहे.  काम हे पूर्ण आणि व्यवस्थित कसे होईल यासाठी इथली माणसे झटत असतात. एकदा काम झाले की “आता झाले” म्हणून शांत बसत नाहीत. अजून काय बदल करून आणखी ते कसे चांगले करता येईल हा प्रयत्न असतो. स्वच्छतेची खूप आवड आहे, रिसायकलिंग ची विशेष पद्धत आहे. बिअर आणि “Sausage” आवडते आहेत. या सगळ्या इथल्या चांगल्या गोष्टी आणि आपली भारतीय संस्कृती यांचे एक तिखट गोड मिश्रण असलेली “अष्टपैलू भारतीय जर्मन” (एकदम क्रिकेटला शोभेल असे) माणसे म्हणून जगण्याचा एक वेगळाच आनंद आहे. तर भेटूया परत असेच कधीतरी...!
आनंद बापट
स्टुटगार्ट, जर्मनी
(nndbapat@gmail.com)
डिसेंबर २०१९ मधेच Coronaच्या बातम्या येऊ लागल्या. फेब्रुवारी महिन्यात भारतातून सुट्ट्या संपवून युरोपात परत येतानाच एअरपोर्टवर काही जण मास्क लावून होते, तेव्हाच मला प्रश्न पडला,’बापरे, ह्यांची मास्क मध्ये घुसमट कशी होत नाही?’ तेव्हा युरोपमध्ये covidची सुरुवात होत होती आणि भारतात तर covidचा फारसा पत्ता नव्हता. फेब्रुवारीमध्ये नवीन प्रोजेक्ट मिळाल्याने माझ्या Frankfurtला दर आठवड्याला वाऱ्या सुरु झाल्या आणि इथे covidने जोम धरायला सुरवात केली. मी प्रवास करत्ये बघून मला आणि घरच्यांना थोडी काळजी वाटू लागली. Covidचा वाढता आकडा पाहून मला Frankfurtला जायची अजिबात इच्छा नसे. त्यातच जर्मन सरकारने औषध किंवा लस उपलबद्ध नाही म्हणून लोकांना घरात थांबण्याचे आव्हान केले. कित्येक वर्षांनी पहिल्यांदा चॅन्सलर ऑफ जर्मनी अँगेला मर्केल ह्यांनी देशवासियांना संबोधिले. ‘आता आपलेच वागणे हेच सगळ्यात मोठे औषध’ असे संबोधून त्यांनी लोकांना social distancingपाळण्याचे आव्हान केले.कठीण परिस्थितीतसुद्धा त्यांचे शांत स्वरातले तर्कसुसंगत,वास्तवाधारित भाषण ऐकताना त्यांच्याबद्दल असलेला आदर अजूनच वाढला.
आता मी दररोज बातम्या,Covid स्टॅटिस्टिकस, Indian embassy in Germany व मराठी कट्टा जर्मनीवर येणारे updates बघत होती. दररोजचे ते बदलणारे ग्राफ्स आणि नंबर्स बघतानाच काही भारतीय न्यूस चॅनेल्स वर युरोपातल्या येणाऱ्या काही चुकीच्या बातम्या, whatsapp forwards ह्यांनी घरच्याना वाटणारी काळजी बघून मग घरी सगळ्याच बातम्यांवर विश्वास ठेवू नका हे आधी सांगितले. एकतर भारताला जाणारी विमानसेवा बंद झाल्याने आपण दुसऱ्या देशात अडकलोय अशीही थोडी भीती वाटली. स्पेन आणि इटलीच्या मागोमाग जर्मनीतही रुग्णसंख्या वाढत होती. तरीपण काही रुग्ण उपचारासाठी इटली आणि स्पेनमधून जर्मनीमध्ये आणले जात असल्याच्या बातम्या होत्या. त्यामुळे इथे पुरेशा मेडिकल सोयी असाव्यात असे अनुमान काढून मी दिलासा दिला. ओळखीतल्या काहीना kurzarbeit (म्हणजे ५०-६०% काम करून तेवढा पगार) चालू झाला. काहींना जॉब ऑफर असूनही काम चालू करण्याच्या तारखा उशिराने देण्यात आल्या. तर काही भारतात सुट्टीसाठी गेलेले , तिथेच अडकले तर काही इथे एकटे होते म्हणून स्वतःहून स्वदेशी परतले. त्यामुळे सगळ्यांच्याच आयुष्यात ह्या Covidने ढवळाढवळ केली आणि ह्या सूक्ष्म विषाणूने दिलेल्या मोठ्या धक्क्याने सगळ्यांचीच गणिते बदलली. जर्मनीने एक देश म्हणून विविध उपाययोजना करत Covidचा जसा सामना केला आणि जगभरात त्याचे कौतुक झाले हे इथल्या प्रशासनाचे यश म्हणावे लागेल.
इथे म्हणावे तर पूर्ण किंवा कडक lockdown झाले नाही.पण युरोपातल्या युरोपात देशांच्या सीमा बंद होण्याची ही आता पहिलीच वेळ होती, त्यामुळे माझ्यापेक्षा वयानं मोठे आणि खूप वर्ष इथे राहणाऱ्या मित्र-परिवाराला मात्र चुकल्यासारखे होत असल्याचे लक्षात आले. सुरुवातीला लोकांनी घाबरून टॉयलेट पेपर्स, ग्रोसरीस जमा करायला सुरुवात केल्याने सुपरमार्केटमध्ये काही गोष्टींचा तुटवडा दिसत होता.पण जीवनावश्यक गोष्टींची कमी होणार नाही अशी हमी मिळाल्यावर लोक शांत झाले. ट्रेन्स,बसेस म्हणा किंवा मेडिकल, सुपर मार्केट अशा सगळ्या सोयी उपलबध होत्या. फक्त सुपर मार्केटच्या वेळा २-3 तासाने कमी झाल्या होत्या आणि काही जागी ट्रेन्स-बसेस पण सुटीच्या दिवसांच्या वेळापत्रकाप्रमाणे चालू होत्या.बाहेर जायला फार बंधनं लादलेली नव्हती पण नंतर एका कुटुंबात नसलेल्या २पेक्षा जास्त लोकांनी बाहेर एकत्र भेटायला काही दिवस बंदी होती.तर एकूणच,काही तुरळक घटना वगळता इथे लोकांच्या शिस्तीमुळे, प्रशासनावर असणाऱ्या त्यांच्या विश्वासामुळे आणि वेळेत प्रशासनाने घातलेले नियम पाळल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. लोकांनी स्वतःसाठी केलेला Lockdown यशस्वी झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ह्या काळात माझे आणि माझ्या नवऱ्याचे परत वर्क फॉर्म होम चालू झाले. माझ्या ऑफिसमध्ये कित्येकांना हे आव्हान वाटले म्हणून online coffe/beer, lunch parties, online ऑफिस kitchen आणि गप्पा असे ग्रुप्स तयार झाले. पण आम्हाला आधीच वर्क फॉर्म होमची सवय असल्याने परत आधीच्या routineमध्ये आल्यासारखं वाटलं. मग एका रूम मध्ये तो आणि एकात मी असं आमच्या घराचं २ ऑफिस रूम मध्ये रूपांतर झाला. कधी मीटिंग नसतील तेव्हा आम्ही आमच्या dining/work table वर आजूबाजूला बसून जर्मनमध्ये बोलून ऑफिसचा फील घेत असू.दुपारी जेवायला एकत्र ब्रेक घेत असू. म्हणावं तर दिनचर्या फार बदललेली नव्हती, फक्त आता चालायलाही बाहेर जायला नकोसे वाटे मग आम्ही घरातच सगळ्या खोल्यांतून चालत आमचे पायी चालणे मोजत असू. हे घरात चालणं आमच्यासाठी नवीन होतं आणि इथे येऊन असं घरी बसावं लागेल असं कधी वाटलं पण नव्हतं. शनिवारी सुपरमार्केटला जाऊन सामान आणणे एवढच काय ते बाहेर जात असू.
मी राहत असणाऱ्या, डुईसबुर्ग शहर ज्या राज्यात आहे, त्या North Rhine Westphalia जर्मन राज्यात सुरुवातीला सगळ्यात जास्त रुग्ण असल्याने रस्त्यावर किंवा चौकात बऱ्यापैकी शुकशुकाट असे. आधीच शांत असणाऱ्या ह्या शहरात अजून निर्माण झालेली शांतता नकोशी वाटे. मार्च एप्रिल मध्ये तर सिटी सेंटरजवळ राहूनही सिटी सेंटर शनिवार रविवार असून पण ओसाड होते.रस्त्यावरून चालतानाही लोक एकमेकांपासून अंतर ठेवून चालू पाहत होते.आणि इतर वेळी घराजवळ असणारे इव्हनिंग हॉटस्पॉट्स,कॅफेस, बिअर बार्स, मॉल्स पण आता चक्क बंद झाल्याने शहरातला जिवंतपणा नाहीसा झाल्यासारखे वाटू लागले होते.
घरी वेळ घालवायला म्हणून साफसफाई , मग निरनिराळे पदार्थ बनवणे, घरच्या घरीच विविध झाडे लावणे, दररोज संध्याकाळी जर्मन भाषाभ्यास आणि कधीतरी योगाभ्यास, संस्कृत भाषाभ्यास असे छंद जडले. खूप दिवसांपासून वाचू वाचू म्हणत धूळ खात पडलेली माझी किंडल, मी पुन्हा पुस्तक वाचायला वापरू लागले.बरच काही लिखाण बाकी होतं, ते साधायचा प्रयत्न केला. माझ्या जुन्या कथा कविता वाचून त्यात रमायला वेळ मिळाला. काही जागा, museumsसुद्धा online फिरले. online चाललेली निरनिराळी challenges पाहून ते करायचा प्रयत्न केला पण मला काही ते जमलं नाही. lockdown मुळे मित्रांनापण भेटणे बंद झाल्याने जवळ राहूनही आता ऑनलाइनच गप्पा, चर्चा कराव्या लागत होत्या. काही नवे -जुने सिनेमे, नेटफ्लिक्सवरच्या सिरिअल्स ह्या सगळ्यांचा आम्ही दोघांनी फडशा पडला.
अशा दिनचर्येची सवय होत आता ३-४ महिने झाले आणि गोष्टी परत new-नॉर्मल म्हणत सुरु झाल्या आहेत. ऑफिस मध्ये आता २ गट करून आठवडे आलटून पालटून जाण्याची परवानगी आहे.आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत्ये आणि गोष्टी पण पूर्ववत होतायत. दररोज मिळणाऱ्या रुग्ण संख्येचा आकडा स्थिरावतोय. सरकारने दिलेल्या सोयी-सुविधांमुळे उद्योगधंदे परत पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करतायत.ऑफिसेस, मॉल्स , सुपर मार्केट्स सगळं काही चालू होतंय फक्त मास्क, sanitizers आणि social distancingसकट..तरी अजून आपण काळजी घ्यायलाच हवी. Covid चा आकडा कमी झालाय तो गेलेला नाहीये हे लक्षात ठेऊन, social distancing पाळत थोडंसं संयमाने सामोरं जायला हवं. हा एक स्वल्पविराम होता, थोडंसं थांबून कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळालेला आराम होता असं मानून लवकरच हा रोग नाहीसा होईल, त्यावर काही उपचार येईल अशी आशा करूया आणि सध्या तरी आपण काळजी घेऊया.
--- चैताली पाटील
Duisburg , NRW,Germany
जर्मनीतील लॉकडाऊन खरंतर माझ्या पथ्यावरच पडलं असं म्हणायला हरकत नाही.थोडीशी कुणकुण लागल्यावरच मनाची तयारी सुरू केली होती. लॉकडाऊन ची सुरुवात इथे खरच शिस्तीत झाली. मास्क लावून बाहेर पडणे, दोन माणसांच्यात दीड मीटर चे अंतर ठेवणे , हस्तांदोलन बंद! वगैरे सगळे नियम पाळताना लोक दिसत होते.
ज्यांना शाळेत जाणारी मुले आहेत त्यांना तातडीने घरीच थांबणे अटळ असल्याने ऑफिस मधले निम्यापेक्षा जास्त लोक घरून काम करू लागले. माझे ट्रेन ने ऑफिस ला येणे जाणे नेहेमीप्रमाणे चालूच होते पण त्यात एक मोठ्ठा फरक जाणवत होता. एकतर शाळेची मुलं नसल्यामुळे पाय ही ठेवायला जागा नाही इतकी गर्दी असलेल्या ट्राम, बसेस आणि ट्रेन अगदी रिकाम्या धावत होत्या. रोज दिसणाऱ्या ओळखीच्या चेहऱ्याची माणसे हळूहळू दिसेनाशी झाली. एकदा तर संपूर्ण ट्रेन फक्त माझ्यासाठीच पाठवल्यासारखी मी एकटीच ट्रेन मधे होते. शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्ते अक्षरशः ओस पडले.
मास्क, हॅन्डग्लोवज,डिसइनफेक्शन मटेरियल यांचा तुटवडा जाणवू लागला. माझी कंपनी औषधे वितरीत करणारी असल्यामुळे कामाचा अतिरिक्त भार पडला होता. आणि सर्वच्या सर्व ऑर्डर्स केवळ याच गोष्टींच्या येत होत्या.त्यामुळे एकीकडे लॉकडाऊन असले तरी वेअरहाऊस मधे तीन शिफ्टस मधे काम सुरू करावे लागले!
पेशंट्स चा वाढत जाणार आकडा बघता परिस्थिती गंभीर वळण घेणार असे वाटू लागले.ऑफिस ला जावे लागत असल्यामुळे सगळीकडून काळजीचा सूर असणारे प्रश्न विचारले जाऊ लागले.
पण या सगळ्यांची काळजी जर्मन रेलवे ने ऐकली आणि अप्रत्यक्षपणे मला मदत केली ! जर्मन रेलवे ने अधिकृतपणे जाहीर केले की रेलवे चे वेळापत्रक बदलण्यात येणार असून, सर्व रेलवे , ट्राम आणि बसेस हॉलिडे प्लॅन नुसार धावतील. अर्थात त्यामुळे त्यांची फ्रीक्वेन्सी फारच कमी होणार होती. आणि माझा ट्रॅव्हलिंग चा वेळ दुपटीने वाढणार होता. शिवाय प्रवासी कमी असले तरी लागण होण्याची रिस्क फारच वाढली होती. अर्थातच मग मला घरून काम करण्याची मुभा आपसूक मिळाली !
आता खऱ्या अर्थाने लॉकडाऊन सुरू झाले.आता मला पहाटे उठून, गडबडीत आवरून बाहेर पडायची गरज नव्हती वा उद्याच्या डब्याची भ्रांत नव्हती! निवांत उठून , न आवरता, घरात हवं तिथे, हवं तसं बसून काम करता येणार होतं. घरून काम करण्याचा आनंद जितका होत होता तितकाच अनेक अनुत्तरित प्रश्नांचा जन्म होत होता. हे असे किती दिवस चालणार? घरातले सामान संपले तर बाहेर जाण्याची रिस्क घ्यायची की आहे ते खाऊन समाधान मानायचं? खूप काळजी घेऊनही आपल्याला लागण झालीच तर काय करायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवायचा प्रयत्न चालू होता.
करोना बाधितांच्या संख्येचा चढता आलेख, उलट सुलट येणाऱ्या बातम्या, करोना विषाणूचा तो चित्र-विचित्र आकार याचा सतत मारा झाल्याने उगाच आपल्या घशात खवखवतय की काय असं वाटत राही. मन शांत ठेवायचा जितका म्हणून प्रयत्न करावा, तितकाच तो बातम्या वाचून असफल ठरत होता. मनाची चलबिचल वाढत होती.घरातून बाहेरच पडलो नाही तर काही होणार नाही हे माहीत असूनही म्हणतात ना , "मन चिंती ते वैरी न चिंती" अगदी तसे होत होते.
दरम्यान भारतातही लॉककडाऊन जाहीर झाला. जगभरातून भारताच्या योग्य वेळी घेण्यात येणाऱ्या निर्णयाचे कौतुक झाले, आणि व्हाट्स ऍप युनिव्हर्सिटी ला तोंड फुटले!! अमुक काढा, लसूण -कांदा यांचे प्रमाण वाढवा, मांसाहारी पदार्थ टाळा,उन्हात करोना मरतो.. वगैरे भोंदू forwards ने मोबाइल भरला.इथपर्यंत ठीक होतं, पण नंतर नथीचा नखरा, नवरा माझा नवसाचा.. अशी चॅलेंजेस सुरु झाली ! सगळे जण जमेल त्या पद्धतीने लॉकडाऊन सुसह्य कसा होईल याचा आपापल्या परीने प्रयत्न करीत होता.
घरून काम असल्यामुळे time table चा बोजवारा उडाला होता. उशिरा उठणे , एकामागून एक  कॉन्फरन्स कॉल , कसे बसे दुपारचे जेवण उभ्या उभ्या उरकावे लागत होते.शेवटी न राहवून एम्प्लॉयी चा स्टेटस busy/break यापैकी काही असेल तर कॉल करू नये असा नियम केला!
पण या सगळ्यात एक लक्षात आले ते म्हणजे शिस्तीला पर्याय नाही. मनात आले या मिळालेल्या बंदिस्त स्वातंत्र्याचा उपयोग आणि आनंद असा दुहेरी योग्य फायदा करून घेता आलाच पाहिजे!
होम ऑफिस चालू झाल्यामुळे माझ्या हातात अचानक संपूर्ण 2 ते अडीच तास बोनस उरत होते त्यातून मग मी रोज एक गीतेचा अध्याय वाचणे आणि किमान 12 सूर्यनमस्कार आणि निदान 15 योगासने यांचा सराव चालू केला. अजून तरी यात खंड पडलेला नाही.
मग आणखी एक कल्पना सुचली. कविता लिहिणाऱ्यांचा आमचा एक व्हाट्स ऍप ग्रुप आहे. त्यावर आम्ही वेगवेगळ्या विषयांवर कविता लिहिण्याचे उपक्रम घेतो. तर अश्या उपक्रमातल्या स्वरचित कविता वाचण्याची ऑनलाइन मैफल भरवायची. कल्पना सगळ्यांना अर्थातच पसंत पडली. या ना त्या कारणासाठी नवनवीन मीटिंग अँड कॉन्फरन्स  ऍप डाऊनलोड केलेलेच होते. त्यावरच या मैफिलीं भरवल्या. अगदी प्रत्यक्ष समोर बसून मैफिलीत कविता ऐकतोय असे वाटायचे आणि तात्पुरतं का होईना त्या करोना च्या गराड्यातून सुटल्यासारखे वाटायचे.
सोशल मीडियातून विविध विषयांवरच्या मुलाखती ऐकणे, अनुभव ऐकणे , महितीवजा प्रेझेन्टेशन पाहणे यात वेळ जात होता. शिवाय सासर-माहेरकडचे नातेवाईक, शाळेपासून चे मित्र मैत्रिणी, कधी कवितेमुळे ऑनलाईन ओळख झालेल्या नेट फ्रेंड्स सोबत असे एक ना अनेक विडिओ कॉल्स चालूच होते. दरम्यान प्रत्येक घराघरातून एक डॉक्टर, एक ऍनॅलिस्ट, एक फायनान्स मास्टर यांचे जन्म होत होते. अनेक तर्कांना उधाण आलं होतं. तर काही जण घाबरून आता जगबुडी जवळ आली, यातून काही सुटका नाही, माणूस माणसाला दुरावला वगैरे इमोशनल बाण मारून उगाच चिंतेत भर घालत होते.
बऱ्याच ओळखीच्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचे यूरोप भेटीचे स्वप्न यावर्षी भंगले होते.लॉकडाऊन ने आमची हक्काची असलेली डिनर डेट तीन वेळा खाल्ली!! माझा आणि माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आणि लग्नाची ऍनीव्हर्सरी ह्या त्या तीन तारखा! पण, "सर सलामत तो पगडी पचास!!", यावर्षी नाही तर आणखी केव्हा, पण सध्या सुरक्षित राहणे महत्वाचे!
त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना पाहून मन हेलावत होते. आपण निदान घरात सुरक्षित आहोत, पण अधांतरी लटकलेल्या प्रवाशांची आता कशी व्यवस्था होणार असे काळजीत टाकणारे प्रश्न मनात येत होते. इतक्यात जर्मनीत अडकलेल्याना, मराठी मंडळ जर्मनी ने मदतीचा हात दिला अशी बातमी वाचली. निःस्वार्थीपणाचा आदर्शच त्यांनी घालून दिला! खऱ्या अर्थाने ते दूत म्हणून आले.त्यांचे करावे तितके कौतुक थोडेच!
लॉकडाऊन मुळे आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे अप्रत्यक्षपणे झालेले saving!!यावर्षी एकही दिवस उन्हाळ्याच्या सुट्टीचे बुकिंग केले गेले नाही.अवांतर खरेदी जसे कपडे,चपला , accessories घेतल्या गेल्या नाहीत!! अजून पुढचे काही महिने हे असेच राहील असे वाटत आहे. पण प्रकर्षाने जाणवले ते म्हणजे आपल्या माणसांची अपल्याबद्दलची असलेली आत्मीयता,प्रेम ,काळजी , जिव्हाळा या गोष्टीच आपल्या संकटाच्या काळात आपल्याला उभारी देतात.अणि आहे त्या परिस्थितीला तोंड देण्याचं बळ देतात.
लवकरात लवकर जगाला लागलेलं हे करोना च ग्रहण सुटून स्वच्छ, आनंदी जीवन पुन्हा सगळ्यांना लाभो हीच एक प्रार्थना करते आणि माझा पुढचा कॉन्फरन्स कॉल घ्यायला पळते.
अंजली लिमये
क्रेफेल्ड जर्मनी
(anjalilimaye25@gmail.com)
नुकत्याच परीक्षा संपून, वसंत ऋतूला सुरु होत होता. नाताळादरम्यान भारतात जाऊन आल्याने मार्च जर्मनीतच घालवायचा होता. भारतात मराठी कवींकडून फक्त लेखी वर्णन ऐकलेल्या वसंताचं युरोपातलं लोभस रूप प्रेमात पडणारं आहे, हे हळू हळू दिसत चाललं होतं. आखेन बेल्जियम आणि हॉलंडच्या सीमेवर असल्याने बृग्स- अमस्टरडॅमच्या सहलीचं तसं नियोजनही झालं होतं, पण पाहता पाहता कोरोनाचा विळखा आखेनला पडला आणि सगळं काही ठप्प पडलं. शेजारचा हायडेलबर्ग जिल्हा जर्मनीतले वूहान म्हणून ओळखला जाऊ लागला. नियमित चालू असलेला जर्मन भाषेचा वर्गसुद्धा पुढील सूचनेपर्यंत रद्द करण्यात आला. बृग्सची सहल रद्द करावी लागली. आता घरातल्या घरात काय करावं, असा मोठा प्रश्न पडला होता. पहिल्या आठवड्यात रोज नवनवे पदार्थ करून झाले, जुन्या मित्रांना/ नातेवाईकांना फोन करून झाले. इतकेच काय तर एक दिवशी अगदी दिवाळी असल्यासारखं घर स्वच्छ करून टाकलं. पण हळू हळू आता पुढे काय? हा प्रश्न सतावू लागला. दिवस पुढे जाईना. घरात स्वयंपाकाचे सर्व साहित्य होते, लॅपटॉप मध्ये भरमसाठ मोव्हीज, नेटफ्लिक्स, वाचायला उत्कृष साहित्य, अशी सगळी श्रीमंती होती. पण मनाने साथ सोडली आणि कशातच मन लागेनासे झाले. रात्रीची झोप कमी झाली. अवेळी झोपेने चिडचिड होऊ लागली. युटूबवर असेच भटकत असताना आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकरांच्या ध्यानाबद्दल कळाले, आणि एकदा प्रयत्न करून पाहूया म्हणून ध्यानाला बसलो. पहिल्या ध्यानाशेवटी आलेला आराम खूप वेगळा होता, कदाचित इतके स्वादिष्ट पदार्थ खाऊन, किंवा नेटफ्लिक्सवर पाहिलेल्या सिरीज, किंवा कॉम्पुटर गेम्सपेक्षा खूप वेगळा. एक साधे सरळ ध्यान इतका आराम कसे देऊ शकते याविषयी कुतूहल वाटले. दिवसातून दोनदा श्री श्री स्वतः ध्यानाचे थेट नेतृत्व करत असल्याचे कळल्यावर मी आखेनमधील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शाखेला संपर्क साधला. जर्मनीत येण्याधी सुदर्शन क्रिया शिकून आल्याने मी लगेच रोजच्या क्रियेच्या ओन्लाईन मिटींग्स मध्ये सामील झालो. सुदर्शन क्रियेने कमालीचे ताजेतवाने वाटू लागले. हळू हळू गोडी लागत गेली. सकाळी साडे सात वाजता आणि दुपारी तीन वाजता असे दोनदा ध्यान, आणि संध्याकाळी क्रिया अशी दिनचर्या तयार झाली. ध्यान करणे म्हणजे नेमके काय करणे? त्यातून काय लाभ होतो? याचा हळू हळू उलगडा होऊ लागला. ध्यान हा बहुदा अतिशय कंटाळवाणा किंवा क्लिष्ट असा विषय वाटतो. ध्यान हे साधारणतः मन एकाग्र करणे असा गैरसमज पसरलेला आहे. खरेतर ध्यान हे मुळात शरीराला तसेच मनाला विश्रांती देणे आहे. विश्रांती देणे हे जितके सोप्पे वाटते तितकेच कठीणही आहे. अध्यानस्थ शरीराची सर्वात विश्रांत अवस्था म्हणजे आपल्या झोपेत देखील, अनाहूतपणे आपले खूप स्नायू ताणलेले असतात. त्या स्नायूंना ताणून ठेवण्यात मनाची खूप उर्जा खर्चीली जात असते. अर्थात बऱ्याच वेळी आपण याविषयी सजगसुद्धा नसतो. ध्यान म्हणजे शरीरातील ताण मोकळा करून तो काही विशिष्ट बिंदूंवर अतिशय हलकेसे लक्ष ठेऊन विश्रांती घेणे आहे. हळू हळू ध्यानाचा सराव करत राहिल्यावर या ताणलेल्या स्नायूंविषयी आपण सजग होतो, आणि त्यांना मोकळे करणे सोप्पे होते. आता यावर अनेक प्रश्न विचारले जातात, शरीरातील ताण कसा मोकळा करायचा? स्वतःहून ध्यान करावे कि कोणाच्या मार्गदर्शनाखाली करावे? यावर उत्तर- जसे लहान मुल खेळून थकून आल्यावर त्याला जशी झोप लागते, तसेच एक विशिष्ट स्वासनक्रिया केल्यावर शरीरातील ताण सुटणे खूप सोप्पे होते. त्या क्रियेचे नाव- सुदर्शन क्रिया. एकदाका ताण सोडता आला, ध्यानाच्या नेतृत्वाच्या सूचनांचा अवलंब करणे सोपे होते. विश्रांती आपोआप घडते, आणि ध्यानाची स्थिती आपोआप येते. पुढची दिशा ध्यानाचे मार्गदर्शक ठरवतात. मुख्य ध्यानस्थस्थिती हि खूप वयक्तिक बाब आहे, आणि तिचे वर्णन करणे अवघड आहे. हि स्थिती वाचून नव्हे तर प्रत्यक्ष करूनच अनुभवायला हवी. ध्यानाने काय घडते? एकाग्रता ध्यानाचा परिणाम आहे, ध्यानाची उत्पत्ती नाही.ध्यान करत राहिल्याने हळू हळू स्वभावात चांगला बदल घडत गेला.कोरोनाच्या साथीमुळे नकोसा वाटलेला एकांतवास ध्यानामुळे अतिशय आनंदमयी झाला. पाहता पाहता एकाग्रतादेखील वाढली, अभ्यास चांगला होऊ लागला. चिडचिड नाहीशी झाली. पुढील सेमेस्टरसुद्धा ऑनलाईन झाले, याचे दुःख न होता आनंद झाला. ध्यानामुळे आलेली दैनंदिन शिस्त आयुष्याला नवे वळण देणारी ठरली.  ध्यानाची गोडी लागली कि जगात अशी कोणतीच गोष्ट उरत नाही, जी आनंद देत नाही. मन आणि वृत्ती संकुचित न राहता व्यापक होते. प्रतिकूलता आपलीशी करायचे धाडस येते. शेवटी जगातील कोणतीही परिस्थिती, अनुकूल असो किंवा प्रतिकूल हि क्षणभंगुर असते. तिचा अंत निश्चित असतो. हे तत्व सगळ्यांना माहिती आहे, तरीपण हे तत्व आपण आत्मसात का करत नाही? भविष्यात काय घडेल या भीतीपाई वर्तमानात असलेल्या सुखावर विरजण पडतो. सध्याची प्रतिकूल परिस्थिती आपल्याला अनादी काळापर्यंत त्रास देत राहणार आहे, असे समजून तिला बळी का पडतो? आज ना उद्या कोरोना संपेल. हा अमूल्य एकांतवास परत मिळेल का नाही माहित नाही. शरीर बळकट करायला लोक व्यायाम करतात, मग मन बळकट करायला ध्यानसुद्धा करायला नको? कोरोनामुळे अध्यात्माचे नवे जग माझ्यासमोर उघडे झाले.
शौनक शशिशेखर कुळकर्णी
(shounakkulkarni2@gmail.com)
आज १८ जून २०२०!मागच्या वर्षी या दिवशी मी जर्मनीत आले.Dependant visa वर. एक वर्ष झालं आज. या एका वर्षात हे जगखर्या अर्थानं किती बदललं! त्याचं कारण अर्थातच कोरोना व्हायरस! कुठच्या देशातूनहा कोण कुठला एवढासा विषाणू आला आणि अक्षरशः होत्याचं नव्हतं व्हायला सुरुवात झाली.
सुरुवातीला'चीन मध्ये आहे नाअजून' किंवा'किती वाईट रे बाबा' अशाreactions आणिकाही व्हीडिओजwhatsapp, facebook वर बघायला मिळत होते, पण त्यांचं रुपांतर'बापरे! आपल्याएरियात एवढा काऊंट?' अशामध्ये व्हायला जेमतेम २-३ महिन्यांचाच कालावधीगेला. फेब्रुवारी, मार्च-मीड पर्यंत माझ्या जर्मन भाषा विषयाच्यावर्गातही या चर्चा रंगत होत्या. माझा एक क्लासमेट इटलीचा,एक स्पेनचातर एक फ्रेंच…असे सगळे जगाच्या वेगवेगळ्या भागातून असल्यामुळेसगळीकडच्या कोरोनाच्या बातम्या कानावरपडत होत्या. आश्चर्यकारक घटना ऐकायला मिळतहोत्या. सुरुवातीला या चर्चा आणि थोडीफार माहिती इतकंच कोरोनाचं स्वरुप होतं आणिएक दिवस मार्च १३ ला सगळ्यांना जर्मन क्लास कडून मेसेज आलाकी,१६ मार्च पासून कोरोनामुळं अनिश्चितच काळासाठीक्लास बंद राहील. सगळ्या शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस तसेच सार्वजनिक ठिकाणं बंद करण्याचाहीनिर्णय घेण्यात आलेला होता. ही परिस्थिती थोडी भयानक आहे हे जाणवायला सुरुवातझालेली होती. अनिरुद्ध म्हणजे माझा नवरा, त्याचंही‘वर्क फ्रॉम होम’सुरु होणार होतं. यातून पॉसिटिव्ह ते काय…की, आपल्याला फक्त घरी बसायचं आहे. त्यामुळं'Okay! म्हणजे आता घरीचराहून काम!WFH बरं आहे की' असा मीसुरुवातीला याकडे बघण्याचादृष्टिकोन होता. स्वयंपाक करुन क्लास ला पळा, अभ्यास करायांतून ब्रेक मिळणार होता. धावपळ होणार नव्हती. हा ब्रेक बरा वाटत होता.आठवड्यातून एकदा होणारे घरचे व्हिडीओ कॉल्स आता रोजच्या रोज होत होते. भारतात घरीजर्मनीतलं वातावरण ऐकून थोडं टेन्शन येत होतं, पण आम्ही घरीच आहे, सेफ आहे हे ऐकून तेहीरिलॅक्स होतहोते. मित्र- मैत्रिणींचे व्हिडीओ कॉल्सनित्यनेमाचे झालेलेहोते. भरपूर मोकळा वेळ असल्यामुळं वेगवेगळ्याrecipes try करणंहीसुरुच होतं. वेळ बरा जात होता.
इकडे युरोपमध्येहळूहळू कोरोनाने भयावह रुप घ्यायला सुरुवात केली. इटली,स्पेन विळख्यातसापडले होते. माझी एक मैत्रिण अमेरिका, एक सिंगापूर, काहीजणी भारतात आणि मी इथे... त्यामुळेसगळीकडच्या बातम्या कळत होत्या. काऊंट कमी होईल अशी आशा दिसत नव्हती. जसजशाबातम्या बघत होतो तसतशी परिस्थिती किती भयावह आहे हे जाणवंत होतं. सगळेचpanic झालेले दिसत होते.मी बाहेर जाणं पूर्ण बंद केलेलं होतं. बाकी युरोपियन देशांच्या मानानं जर्मनीतीलपरिस्थीती स्टेबल वाटत होती. पण दिवसातून १०वेळा बातम्या, मोबाइल वर सततयेणारे मेसेजेस, worldometer वरंचसततचं काऊंटtracking यासगळ्या भीतीचा मनावर व्हायचा तोच परिणाम झाला. सततच्या बातम्या बघून मलाही आजारीपडलेय, घसादुखतोय, BP low झालंयअसं वाटायला लागलं आणि हे कोरोना फोबियाचे परिणाम शरीरावरही दिसू लागले. डॉक्टरांनाफोन करावा की नको यात चार दिवस घालवले. घरातली कामं करायची इच्छा गेली होती. मगweakness कमीहोईना म्हणून शेवटीappointment साठी डॉक्टरांना (Houseartz) फोनकेला आणि तोडक्या मोडक्या जर्मन भाषेतappointment मिळेल का हे विचारलं. डॉक्टरांनीappointment मिळू शकणारनसल्याचं सांगितलं कारण अर्थातच कोरोना पेशंटpriority वर होते. पण ओळखअसल्यामुळे डॉक्टरांनी फोनवरच २-३ उपाय सांगितले आणिहे ही सांगितलं की, 'do not worry and avoid watching unnecessary news'. त्यानंतर “सोनारानेच कान टोचलेले बरे” हाटोमणाही नवऱ्याकडून ऐकावा लागला.
तसं इथे जर्मनीतपूर्ण लॉकडाऊन लागू केलं गेलं नव्हतं. सुरुवातीला मात्र सगळे लोकpanic झालेले असल्यामुळंआवश्यक वस्तूंचा थोडा तुटवडा जाणवला, पण नंतर गव्हरमेंटनी केलल्या आवाहनानंतरलोकांनीही त्याला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. इथे बाहेर फिरण्यावर पूर्ण बंदीनव्हती पण नियम पाळूनच लोकांनी बाहेर फिरावं असा आदेश होता. जर्मन लोक वेळपाळण्याचा बाबतीत आणि शिस्तीच्या बाबतीत किती काटेकोर आहेत हे गेल्या एक वर्षात बघितलंच होतं पण या कोरोना काळात ते जास्त जाणवंलं. एकमेकांच्या घरी जायचं नाही म्हणजे नाहीच जायचं! या काळात सरकारला आपल्यापरीनं मदत करायची म्हणजे घालून दिलेले नियमपाळायचे. बाहेर फिरतानाsocial distancing पाळणे, गरज असेल तेव्हाmaskआणिglovesवापरणे या गोष्टीलोकांकडून सहजपणे आपल्याशा केल्या गेल्या.'कोरोना का आहे?' म्हणूनवैतागण्यापेक्षाsummer सुरु झाल्यामुळेgardening, cycling, running तसेचगरजेच्या लाकडी वस्तू घरच्या घरी तयार करणेवगैरे गोष्टीत मनरमावणारे जर्मन्स मला भावले.
इकडे घरी नवर्‍याच्याroutine मध्येतसा फरक पडला नव्हता. तो दिवसाचे ८-९ तास ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा. मला आतापूर्ण बरं वाटत होतं पण वेळ घालवणं हळूहळू अवघड होऊ लागलं. पुस्तकं वाचायची आवडहोती पण इथे हव्या त्याhard copies मिळत नाहीत हे माहिती होतं. बरोबर आणलेली पुस्तकं केव्हाच वाचून झाली होती. मग‘किंडल’ वर वाचायचा प्रयत्न करु असं म्हणून वाचन सुरु केलं.‘सर सलामत तो पगडी पचास' या न्यायानं, आपली तब्येत ठणठणीतठेवणं गरजेचं आहे हेही मनाशीपक्कं केलं.Routine पुन्हासुरु केलं.व्यायाम,स्केचिंग, झूम वरtechnical classes, जर्मनशिकणे, होमडेकोर आणि वाचन सुरु केलं. गोष्टी थोड्या सोप्या झाल्या.
दरम्यान, मराठी कट्टाच्या अजितदादांनी एक facebook live सेशन घेतलं, ते आवर्जून attend केलं. त्यानंही कोरोनाची भीती कमी व्हायला मदत झाली. विचारकरता करता हे लक्षात यायलालागलं की mask, gloves हे आता ' new normal' होणारआहे. आपल्या घरी लहानपणी लावलेल्या सवयी पाळल्या तर हे कोरोना प्रकरण फारसं अवघडजाणार नाही.Corona or no corona, we are ready. We are proud, we survived this together!!!
शेवटी अमिताभ म्हणतो तसं “गुजर जायेगा..मुश्किल बहोत है..मगर वक़्त ही तो है..गुजर जायेगा”
अपूर्वा कुलकर्णी-पत्की
(apoorwakulkarni1990@gmail.com)
"आई उद्यापासून स्कूलला जायचं नाही, मज्जा! हे ओरडतच पिया घरात शिरली. ह्या चौथीतल्या मुलीला कोरोनावर नियंत्रणासाठी जर्मनीत मार्च महिन्यात घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सुट्टी मिळाली, पण रोज टीचरने ऑनलाइन पाठवलेला अभ्यास घरी बसून करावा लागणार आहे,हे सुद्धा माहित होतं.पण येनकेन प्रकारेण अशी सुट्टी मिळाली ना, ह्यातच ती बया खुश! आमचे सोळा वर्षांचे चिरंजीव ...त्यांना तूर्तास तरी स्कूल्स बंद झाल्याने उशिरा उठायला मिळणार, ह्याचा जास्त आनंद. मग रोज स्कूलकडून मेल वर कितीही अभ्यास मिळो...आमची करायची तयारी. दुसरीकडे मित्रांना भेटता येणार नाही,trips नाहीत, कधी वाटलं तर बाहेरचं खाता येणार नाही, आणि friseur ची शॉप्सपण बंद...लुक maintain कसा करायचा हि चिंता!...अन नवरोबा ...त्याचं काही औरच....त्याला होम-ऑफिस तितकंसं कधीच पसंत नव्हतं. पण आता इलाज नाही.आणि त्यात पूर्ण दिवस बायकोची कटकट झेलावी लागेल(हे मनात असणारच, हा माझा अंदाज). माझ्यासारख्या गृहिणीच्या मनात मात्र पहिला विचार आला तो हाच...कोरोनाने एवढी लोकं बाधित झालीयेत व मृत्यूच्या जाळ्यात ओढली गेली आहेत.अशावेळी लॉकडाऊनमुळे सर्वजण घरी सुरक्षित तरी राहतील.'सुरक्षितता' ह्या नावाखाली मी एक उसासा टाकला.
सुरुवातीचे दोन-तीन दिवस सगळेजण घरात आहेत, ह्या कल्पनेने छान गेले. वाटले, कि लॉकडाऊनमुळे इन्फेक्टेड केसेस कमी होतील. रोज उठल्यावर worldometer वर जाऊन कोरोनाचे अपडेट्स बघायला सुरुवात झाली. इटली व स्पेन ह्या शेजारील देशांची लॉकडाऊन मधील परिस्थिती पाहून व तेथील कोविद १९ चे गंभीर स्वरूप पाहून जर्मनीत लोकडाऊनच्या आधीपासूनच लोकांचं panic buying सुरु झालं होतं. टॉयलेट पेपर्स, सॅनिटायझर  व बेकिंगसाठी मैदा ह्याचा साठा करण्यावर लोकांनी जास्त भर दिला. त्यामुळे लॉकडाऊनच्या  सुरुवातीच्या  काळात ह्या गोष्टी बाजारात दिसेनाश्याच झाल्या. तेव्हा Govt ने सुपरमार्केट्स नेहमीप्रमाणेच चालू राहण्याची ग्वाही दिल्यानंतर लोकांनी हे सगळं थांबवलं. मी सुद्धा लगबगीने घरात अन्नधान्याचा व इतर उपयुक्त गोष्टींचा साठा केला कि जेणेकरून सतत सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले जावे. काय सांगावं, हा संसर्गजन्य 'कोरोना' कधी अटॅक करेल व आपला नंबर लागेल! Lockdownच्या सुरुवातीच्या काळात जर्मनीत दिवसेंदिवस इन्फेक्टेड केसेसचा आकडा वाढतच होता.
हे पाहून माझ्यासारख्या कमकुवत मनाच्या मुलीने जरा टेन्शन घेतले आणि काहीही तेलकट-तुपकट खाण्यात आलं नसतानाही माझा घसा दुखू लागला! कसकसल्यासारखं वाटू लागलं. मग काय..लगेचच कोरोनाची लक्षणं, उपचार ह्यावर सगळं वाचून-पाहून झालं व घरगुती उपचारही ताबड्तोब सुरु झाले.साबणाने स्वच्छ हात धुवून,तोंडाला मास्क बांधून मी रोज स्वयंपाक घरात यावे, स्वयंपाक करावा, व नंतर ओटा साफसूफ करून  माझ्या रूममध्ये जाऊन बसावे(I mean partially quarantine व्हावे) असं एक आठवडा routine होतं. त्यात सोशल मीडिया वर 'एन्जॉयजिंग इन लॉकडाऊन’च्या लोकांच्या पोस्ट्स पाहिल्या कि वाटायचं आपल्याच बाबतीत  तेवढं काही बरं नाही चाललं. नाही म्हणायला, मुलाने समजावलं,"आई,तुला वाटतं तसं काही नसणार आहे. Weather changeचा इफेक्ट असणार आहे". नवऱ्याला माझा भित्रट व कमकुवत स्वभाव माहित असल्याने माझ्या कोरोनाच्या संशयावर काहीही गांभीर्य नं दाखवता उलट त्याने खिल्ली उडवणे सुरु केले. “अरेरे! खोकला! हा तर कोरोनाच!" "बापरे! तुला शिंका आली! हि तर कोविद १९ ची लक्षणं...!" अशातच एक दिवस छान ऊन पडलं म्हणून मुलं वॉकला जाऊ म्हणू लागली. 'मला बरं नाहीये..तुम्ही तिघं जावा’ हे माझं म्हणणं नवऱ्याने ऐकूनच न घेता मला त्यांच्याबरोबर घराबाहेर काढलं. माझ्या भीतीत भरीस भर म्हणून सोसायटीच्या बाहेर आल्यानंतर समोरच मोठ्ठा बोर्ड दिसला...'कोविद १९ टेस्टिंग सेंटर!’ आमच्या सोसायटीतून बाहेर आलं कि  समोरच एक Gesamtschule आहे. त्या स्कूलच्या आवारात हे सेंटर ओपन केलं होतं. सेन्टरच्या गेटातच सर्व शरीर पॅकबंद करून, तोंडाला मास्क लावून उभे असलेले security guards, रुग्णवाहिका, गाड्यांतून कोविद टेस्टिंग साठी येणारे काही लोकं आणि त्यातच सर्वत्र स्मशानासारखी शांतता असलेलं वातावरण! ...हे सर्व पाहून एका क्षणात मला घाम फुटला. ते गंभीर स्वरूप पाहून मी खडबडून जागी झाले. साध्या साध्या मेडिकल ट्रीटमेंटला घाबरणारी मी! हे कोविदचं टेस्टिंग, ट्रीटमेंट  मला विचार करण्याच्या पलीकडचं होतं. मग मी ठरवलं कि आपल्याला कोरोना बहुदा झालाय, होईल, होऊ शकतो हे मनात न आणता सर्वतोपरी काळजी घेऊन लॉकडाऊन  मध्ये आपल्या कुटुंबाबरोबर राहायचा पूर्ण आनंद उपभोगायचा. आता मनातील नकारात्मकतेची जागा सकारात्मकतेने घेतली होती.
"सुबह हो गई मामू" असं म्हणत दुसऱ्या दिवसापासून एक नवीन सुरुवात केली. सर्व प्रथम टाइम टेबल तयार झालं. रोजचा व्यायाम, नाश्त्याला व जेवायला वेगवेगळे पदार्थ करणं, रात्रीचं जेवण झालं कि पत्ते,कॅरम, मोनोपॉली खेळणं, वाटल्यास एखादा बऱ्याच वेळेपासून पेंडिंग असलेला पिक्चर पाहणं, असं सुरु झालं. सर्वजण घरी असल्याने ३ वेळच्या खाण्याऐवजी मधेमधे सटरफटर खाण्यात भर पडलीच. अशावेळेस भांड्यांसाठी डिशवॉशर तरी किती सतत लावणार. मग हे ऍडिशनल काम मुलांना वाटून घेण्यास सांगितलं. "एक्सट्रा पडलेली भांडी आपल्यालाच घासावी लागतात व त्यामुळे ग्लासेस, बाउल्स एक्सट्रा काढू नकोस हं",असं दोघं एकमेकांना समजाऊ लागले. नवऱ्याला कधी कधी नाश्त्याचे हलके-फुलके पदार्थ बनवण्यास सांगितले गेले तेव्हा फोडणीच्या डब्याची काय अवस्था झाली हे सांगणे नकोच! एकानेच बाहेर पडून ग्रोसरी आणणे आणि मग सर्वांनी मिळून ग्रोसरी डिसइन्फेक्ट करून सेग्रीगेट करून ठेवणे, भाज्या स्वच्छ धुवून ठेवणे असे रुटीन झाले. घरातच कायम सर्वजण असल्याने सर्वांचीच घरातली कामं करायची frequency वाढली. माझा आरडाओरडा सहन करण्यापेक्षा तिथल्या तिथे लगेचच गोष्टी जागेवर ठेवून आपापल्या रूम्स स्वच्छ ठेवणे मुलांना परवडू लागले. ह्या सर्व कामांसाठी आधी कुरकुरणाऱ्या ह्या मुलांनी तत्परता, टापटीप, घरकाम व स्वच्छतेशी हळहळू आपली मैत्री करून घेतली.
हे सर्व सुरु असतानाच एकीकडे भारतातदेखील कोरोनाच्या प्रसारामुळे लॉकडाऊनची घोषणा झाली. परत मनात एक अनामिक भीती जागी झाली. आपले आई वडील, सगेसोयरे व भारताचाच कसं होणार?  म्हाताऱ्या लोकांना तर कोविद १९ पासून जास्त धोका! आपण आपल्या वयस्कर आईवडिलांपासून लांब...मनात एक प्रकारची अपराधाची भावना अशावेळेस जागी झाली. मग रोज आईवडिलांशी  काहीतरी चांगल्या विषयावर व्हिडीओ कॉल करून गप्पा मारणे सुरु झालं. थोडक्यात काय तर एकमेकांनी परस्परांना तुम्ही आमची काळजी करू नका, आम्ही आहोत तिथे सुखरूप आहोत, हा अप्रत्यक्षरीत्या संदेश देणं सुरु केलं. जर्मनीत वॉकला बाहेर पडायला बंदी नव्हती पण भारतात मात्र त्यावरही बंदी! त्यावेळी भारतात मोदीजींच्या सरकारने एक छान आयडिया काढली कि जेणेकरून लोकं घरीच बसून राहतील व बाहेर पडणार नाहीत. रामायण, महाभारत ह्यांसारख्या पूर्वी प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या सिरियल्स दाखवायला सुरुवात केली. आम्ही पण मग 'News On Air' हे ऍप इन्स्टॉल करून रामायण-महाभारत पाहायला सुरुवात केली. ह्यांतील मुलांना आधी कथन केलेल्या गोष्टी Tv वर प्रक्षेपित होत असल्याने जास्त चांगल्या रीतीने आत्मसात होत होत्या. त्यांनीही त्यात रस घेऊन खोलवर माहिती विकिपीडिया व इतर वेबसाईटसवर वाचून काढली. आपली मुलं इथं राहूनही आपल्या प्राचीन ग्रंथांबद्दल एवढी जिज्ञासू आहेत, हे मला तेव्हा जाणवलं.
सोसायटीतहि सगळे घरीच. रोजच्या धकाधकीच्या जीवनात एरवी स्मितहास्य करून हाय, हॅलो, Guten Tag, Guten Morgen म्हणणारे आम्ही शेजारी एकमेकांची सवडीने विचारपूस करू लागलो. जेव्हा छान हवा असेल तेव्हा सिंगल्स मध्ये बॅडमिंटन खेळू लागलो. हे सर्व अर्थातच लॉकडाऊनचे नियम पाळूनच.
एकीकडे इथल्या नेहमी भेटणाऱ्या मित्र-मंडळींना ZOOM वर भेटून गप्पा मारणं, ठराविक दिवशी म्युझिकल प्रोग्रॅम करणं, स्तोत्रपठण करणं हे पण रुटीनचा एक भाग झालं. व्हाट्स ऍप वर कोडी सोडवणं, फेसबुकवरच्या हरतऱ्हेच्या challanges च्या पोस्ट्स पाहणं हे पण सुरू होतच. ह्यातून स्वतःबरोबरच इतरांनाही सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्यात एकमेकांनी हातभार लावला. मनात आलं, हे लॉकडाऊन माणसाला माणसापासून दूर ठेवण्यासाठी केलं खरं...पण त्याने माणसं एकमेकांच्या दूर नं जाता अंतःकरणाने एकमेकांच्या जवळच आली.
मे च्या सुरुवातीलाच जर्मनीने स्टेप बाय स्टेप लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय पण घेतला. कारण आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली होती. अर्थात सोशल डिस्टंसिन्ग व मास्क चा वापर चालू ठेवूनच. जर्मनीने इतक्या कमी कालावधीत म्हणजे अवघ्या दीड-दोन  महिन्यांत  बऱ्यापैंकीच कोरोनावर मात केल्याचं सर्व जगालाच नवल वाटलं. ह्या सगळ्याचं श्रेय जातं ते अर्थातच इथल्या Govt.ची दूरदृष्टी, समयसूचकता, कोरोनाला घालवून लावण्याकरता लादलेले निर्बंध, सुसज्ज वैद्यकीय यंत्रणा, नागरिकांमध्ये अंगीभूत असलेली शिस्तबद्धता, सामाजिक जागरूकता व जवाबदारीची जाणीव इ. त्यामुळे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत इथल्या सरकारने व जनतेने कोरोनाला बहुतांशी निगेटिव्ह केलं, असं म्हणायला हरकत नाही.
Lockdown संपायच्या आधीच माझी घरची बाग पहिल्यांदाच आम्ही चौघांनी मिळून लावलेल्या भाज्यांनी व फुलझाडांनी छान बहरली होती व त्यामुळे पक्ष्यांची किलबिलदेखील जोरात सुरु होती तर एकीकडे घरात मुलांची किलबिल! ह्या वातावरणाने माझे घर व आंगण अगदी कसं बहरून गेलं. तेव्हाच मी माझ्या मनात म्हंटलं होतं...
अर्चना ...कोरोना से डरोना...लॉकडाऊन से गट्टी करोना !!!
Archana Deswandikar
(archanahd@gmail.com)
चार दिवसांच्या सुट्टीनंतर आम्ही काल स्टुटगार्ट हुन एर्लान्गेन ला येत होतो. एकतर लॉन्ग वीकेंड, त्यात जरा शिथिल झालेले quarantine. त्यामुळे तसा नेहमी रिकामा असणारा हा रस्ता बराच बिझी वाटला. जर्मनी मधलं आमचं जवळपास निम्मं वास्तव्य स्टुटगार्ट मध्ये झाल्यामुळे त्या शहराशी एक निराळंच नातं जोडलं गेलंय. त्यामुळे एर्लान्गेन ला येऊन एक वर्ष होऊनदेखील स्टुटगार्ट ला जायचे आणि तिथल्या मित्रमंडळींना इकडे बोलवायचे आमचे प्लॅन्स सारखे सुरु असतात. गेले ३-४ महिने quarantine मुळे होम ऑफिस आणि फक्त आठवडी बाजार सुरु असल्याने माणसांशी आमचा संपर्क जवळपास शून्य झाला होता. त्यात भर म्हणून एर्लान्गेन सारख्या लहान गावात quarantine आणि नॉर्मल रविवार हा सारखाच असतो. नाही म्हणायला नेटफ्लिक्स सारख्या एप्सनी आयुष्य तसं सुकर केलं होतं, पण नंतर त्याचा पण कंटाळा आला. म्हणून हा वीकेंड स्टुटगार्ट मध्ये घालवायचा हे आमचं बरंच आधि ठरलं होतं. जसे प्लॅन केले होते तसेच हे दिवस मस्त गेले आणि नको असताना सुद्धा रविवारी दुपारी आम्हाला परत एर्लान्गेन ला निघावं लागलं. जसं जसं आम्ही घराच्या जवळ येत होतो तसं तसं हे quarantine चे गेले ३-४ महिने डोळ्यासमोरून तरळत होते.
कोरोना चा प्रभाव जेव्हापासून सुरु झाला तेव्हापासून सर्वांचे आयुष्य पार बदलून गेलं. चीन इटली व स्पेन नंतर जर्मनी मध्ये हा न दिसणारा राक्षस येणार हे गृहीतच होते. या विकसित देशाने सुद्धा आपल्या इमेज ला साजेल अशाच पद्धतीने ही युनिक सिच्युएशन मॅनेज केली. लिमिटेड लोकसंख्या, चांगली healthcare सिस्टिम आणि अतिशय organised लोक यामुळे हे challenge जर्मनीने चांगल्या पद्धतीने पेलले. या एकांतवासामध्ये एक गोष्ट खूप तीव्रतेने जाणवली की आपली शारिरीक आणि मानसिक तंदुरुस्ती हि आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. शारिरीक तंदुरुस्ती ही आपण एकटे राहून मिळवू शकतो, पण मानसिक तंदुरुस्ती साठी आपल्याला लोकांमध्ये मिसळावंच लागतं. म्हणून ज्याचे खूप सारे मित्रमैत्रिणी असतात ते नेहमीच खूप नशीबवान असतात आणि आम्ही नक्कीच त्यातले एक आहोत.
असे खूप काही रँडम डोक्यात सुरु असतानाच प्लेलिस्ट वर पुलंचं नामू परीट सुरु झालं आणि डोक्यात प्रकाशाचा अण्णू गोगट्या झाला ! तसं कर्नाटकी आडनाव असूनसुद्धा बॉर्न आणि ब्रॉट अप महाराष्ट्रातला असल्याने - मनसेच्या घटनेनुसार - मी मराठीच आहे आणि त्यामुळे पुलंची सगळी पुस्तकं अगणितवेळा कोळून पिलीत. त्यामुळे रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीतल्या अंतूशेट पासून बेळगावचे कृष्णराव हरिहर उर्फ रावसाहेब आणि सख्यापासून चितळे मास्तरापर्यंतची सगळी पात्रं चुटकीसरशी ओ देतात. हे सगळे लोक जणू काही आपल्या आयुष्यात अजूनही आहेत असं मला नेहमी वाटत असतं आणि हे फक्त पुलंच करू शकतात. त्यांना फक्त माणसाचं वेड होतं आणि त्यांनी त्यांच्या लिखाणातून मानवी स्वभावाचा जणू स्वर्ग उभा केला. एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ जमल्यावर काय होतं हे जसं त्यांनी सांगितलं तसंच एखाद्या गोष्टीची वीट केव्हा येते हे सुद्धा दाखवलं. जीवनाच्या समरात रक्तबंबाळ व्हायचे प्रसंग आले काय, किंवा बससमोर म्ह्स आडवी आली काय, किंवा नवरदेवाने लग्नाच्या दिवशी हातरुमालासाठी हट्ट केला काय, कुठल्याही प्रसंगाला तोंड दिल्याशिवाय नाही राहायचं, खंडो बल्लाळांचं रक्त आहे हे आपल्या मनावर ठसवलं. या सगळ्या गोष्टींमधून जर काही बोध घ्यायचा असेल तर तो एव्हढाच आहे की आपल्या या आयुष्यात माणसं जोडणं आणि टिकवून ठेवणं हि कला ज्याला जमली तो तरला. दैनंदिनरित्या खूप सारी माणसं आपल्याला भेटत असतात, काही ऑनलाईन, काही ऑफलाईन, काही वारंवार, काही प्रसंगानुरूप, काही मुंबईकर, पुणेकर किंवा सांगलीकर. पण सर्वांचे एकमेकांच्या कथेत काहीतरी रोल्स असतात आणि त्या कथा समांतर सुरु असतात. तर जेव्हडं जमेल तेव्हडं आपला रोल उत्तमपणे निभावून आपण पुढच्या स्क्रिप्ट साठी वाट बघणे एव्हडंच आपलं काम असावं.
सध्या कोरोना मुळे खूप जणांसाठी खूप कठीण काळ आहे. आर्थिक, शारीरिक आणि मानसिक अशा तिहेरी लेव्हल वर आघात करू शकेल असं पहिलंच challenge आपल्या पिढीसमोर आलंय. त्यामुळे आपल्या आजूबाजूला कुणाला काही कमी जास्त आहे का हे बघत राहून जमलं तर जादूची झप्पी, किंवा सोशल डिस्टंसिन्ग पाळून एक जादूची स्माईल देऊन काहीही लागलं तर मी आहे हे सांगणं, एव्हडंच सध्याच्या स्क्रिप्ट मध्ये आहे. बघू मग आपलं picture पुढं काय काय दाखवतंय ते !
कळावे, लोभ असावा.
ओंकार नाडगीर
(omknadgir@gmail.com)
फेब्रुवारीच्या अखेरीस एका रेस्टॉरंट मध्ये काही कामानिमित्त आम्ही मैत्रिणी सहज कॉफी पितांना एक जण तिच्या नुकत्याच  झालेल्या फ्रान्स दौऱ्याचं आणि कोरोना विरुसचे तिथले अनुभव मांडत होती.तेव्हा सर्वप्रथम कोरोनाविषयी विविध विचार,जागरूकता अनुभवली. पण आम्हला त्याची झळ अजून काही लागली नव्हती.. लग्न झाल्यापासून मी आणि तुषारचा प्रवास म्हणजे आधी मुंबईत मी आणि जर्मनीत तो. तदनंतर फ्रँकफूर्ट मी आणि म्युनीक तो असाच चालू होता..ब्रेक मिळत होता तेव्हा आमची जगभ्रमंती चालू होती..पण पोकळी जाणवतेय कसली ते उमगत नव्हतं.
जर्मनीत कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत होती आणि बंधनं तर काहीच नव्हती फक्त 'पॅनिक buying' चे फोटो व्हायरल होत होते..आम्ही पक्के भारतीय असल्याने जिभेची आणि.... अजूनही सवय बदलली नव्हती.मार्चच्या मध्यात जर्मनीने बॉर्डर सील केल्याचं वृत्त आलं.भारताने ही बऱ्याच प्रमाणात सुरुवातीपासून प्रतिबंधात्मक निर्णय घेतले होते..तात्पुरता परदेशी वास्तवास असणाऱ्यांची तर अगदी 'ने मजसी ने' अवस्था होती.. जर्मनकरांमध्ये एक प्रकारचा विश्वास जाणवला मला कदाचित तो स्वतःवर, गव्हर्नमेंटवर असेल किंवा मेडिकल सिस्टिमवर..काही झालच नाही या अविर्भावात त्यांचा दिनक्रम चालू होता..आणि मी मात्र चिंता करी विश्वाची प्रमाणे..ऑलिम्पिक चालू असल्यासारखं रोज ती वाढणारी आकडेमोड बघत दिवस ढकलत होते..
तुषारचे क्लायंट विसीट्स अजूनही चालूच होते.. दीपा वहिनींना कॉल केला तर त्यांच्या घरी ही परिस्तिथी सारखीच.सतत धाकधूक.. एका सोमवारी अचानक तुषार संध्याकाळी घरी होम ऑफिस चालू झाल्याचं निरोप घेऊनच आला.थोडं हुश्श झालं आणि मी कोरोनाचे अपडेट पाहणं कमी केलं.जर्मनी मेडिकल सुविधांसाठी प्रसिद्ध आहे..पण इटलीची केविलवाणी स्थिती प्रसारमाध्यमातून वारंवार बघून आपण प्रथमदर्शी जरी दाखवत नसलो तरी मनातून थोडे हादरले होतोच. जेव्हा लॉकडाऊन मध्ये आम्ही रेवेत गेलो तेव्हा थंडी ओसरली नव्हती(तशी जर्मनी मध्ये आम्हा मुंबईकरांना कायमच वाजते म्हणा) त्यामुळे जॅकेट्सचा लवाजमा,त्यात  हँडग्लोव्हज,मास्क ने आणखी भर टाकली होती..ते इवले इवले डोळे आरशात बघून कोणती मोहीम लढायला निघालोय असंच वाटलं मला..पण तिथे गेल्यावर सगळं वातावरण बघून जीव भांड्यात पडला आणि आता तर सवयीचंच झालं.सॅनिटाइझर, लॉकडाऊन, क्वारंटीन,हायड्रॉक्सीक्लोरोक्विन असे बरेच पठडीतले शब्द नव्याने कळले.
पाहिले दोन-तीन दिवस मस्त आनंदात गेले..मग दोघांनीही थोडं प्लंनिंग करून दिवस आखला कारण दिवसभर त्या लॅपटॉपवर बसून डोकं ,मन आणि शरीर वजनदार होत असल्याची जाणीव  झाली होती..त्याचदरम्यान साधारण भारतातही लॉकडाऊन सुरू झालं होतं..कधीही न आलेले "हितचिंतकांचे" फोन आणि मेसेज येत होते.. बस एक छोटासा व्हारस जीसने बदलिथी सबकी दुनिया..मराठी कट्ट्याचे सोशीअल मीडियाचे अपडेट घरचे कटाक्षाने फॉलो करत होते.'आपलं माणूस'  मुलांच्या सोबत आहे म्हणून एका अर्थाने निर्धास्तच होते..एखादी गोष्ट आपण करतोय तर ती 'का ' करतोय याचा विसर आपल्याला बऱ्याचदा पडतो कधी आपण ब्लाइंडली फॉलो करतो तर काही नुसतं वर्षानुवर्षे करतो.. चित्रं रेखाटतानाही आपल्या भावना त्या चित्राच्या डोळ्यात उतरवतो आपण आपल्याच नकळत.. .तसच अगदी रामरक्षे पासून विविध पारायणं.खूप प्रश्न..मग थोडी चर्चा फॅमिली कॉल मध्ये चालू झाली. अगदी सगळ्यांकडेच अमाप वेळ होता.. आणि काही अडलं तर आई बाबा होतेच. त्यात रामायण महाभारत सुरू झालं ..कधीही न ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टी त्याचे संदर्भ ,त्यावर केलेलं गूगल..डिस्कव्हरीवर त्याचदरम्यान टेलिकास्ट झालेला रिसर्च.. अनेक तर्क वितर्क ..एक विलक्षण अनुभूती येत होती.
चान्सलर मॅडमच्या प्रेस कॉन्फरेन्स नित्य नियमाने पाहू लागलो..प्राथमिक उद्देश कोरोना असला तरी जर्मन भाषा थोडी अजून अवगत करणं हा हेतू ही होता.फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बरेच  कलाकार कथा, कवितांचे अभिवाचन करत होते त्याचा आस्वाद घेत होतो.व्हाट्सअँपवर ग्रुपमध्ये रोज धडकणारी नवनवीन कोडी आणि फेसबुकवरील कंमेंट्स मधली चारोळी हा ही एक मजेशीर अनुभव होता..ऑनलाइन निरनिराळ्या लेखकांची पुस्तके विनामूल्य उपलब्ध होती त्यामुळे डोक्याला खुराक सतत चालूच होता.याचदरम्यान तुषारने नकळत माझ्या  साम्राज्यावर म्हणजेच किचनवर गनिमी काव्याने शिरकाव केला होता..(स्पेशिअल थँक्स : मराठी कट्टा मित्रांचे सोशिअल मीडिया अपडेट्स.रोज विविध स्टेटस,कृती,क्रमांक ,दिनांक,अतिउत्तम सादरीकरण.. मग मोहाच्या मधात पडायला होईलच ना) पण जगातले उत्तम शेफ हे अगदी बल्लवचाऱ्यांपासून  सत्ता गाजवतायेत यावर पुन्हा आमच्याघरीही शिक्कामोर्तब झालं..
या होम ऑफिसमूळे नक्की काय राहून जातंय ते हळू हळू उमगत होत आणि लेख लिहित असतांनाच तुषारला  म्युनीकवरून बोलवणं आलं..म्हणजे पुनश्च हृदय मी स्पंदन तू फक्त फरक एवढाच फ्रँकफूर्ट मी आणि म्युनीक तू....एका लहानश्या(डोळ्याला न दिसणाऱ्या)विषाणूने  संपूर्ण जगाच्या जीवसृष्टीला वेठीस धरलंय तरीही मनुष्य मात्र 'चरैवेति चरैवेति' म्हणत आपली वाटचाल करतोय..कारण शो मस्ट गो ऑन !
अपुर्वा वाणी-अमृतकर
(apurvawani19@gmail.com)