कारण शो मस्ट गो ऑन ! - अपुर्वा वाणी-अमृतकर - (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)
फेब्रुवारीच्या अखेरीस एका रेस्टॉरंट मध्ये काही कामानिमित्त आम्ही मैत्रिणी सहज कॉफी पितांना एक जण तिच्या नुकत्याच झालेल्या फ्रान्स दौऱ्याचं आणि कोरोना विरुसचे तिथले अनुभव मांडत होती.तेव्हा सर्वप्रथम कोरोनाविषयी विविध विचार,जागरूकता अनुभवली. पण आम्हला त्याची झळ अजून काही लागली नव्हती.. लग्न झाल्यापासून मी आणि तुषारचा प्रवास म्हणजे आधी मुंबईत मी आणि जर्मनीत तो. तदनंतर फ्रँकफूर्ट मी आणि म्युनीक तो असाच चालू होता..ब्रेक मिळत होता तेव्हा आमची जगभ्रमंती चालू होती..पण पोकळी जाणवतेय कसली ते उमगत नव्हतं.
जर्मनीत कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत होती आणि बंधनं तर काहीच नव्हती फक्त 'पॅनिक buying' चे फोटो व्हायरल होत होते..आम्ही पक्के भारतीय असल्याने जिभेची आणि.... अजूनही सवय बदलली नव्हती.मार्चच्या मध्यात जर्मनीने बॉर्डर सील केल्याचं वृत्त आलं.भारताने ही बऱ्याच प्रमाणात सुरुवातीपासून प्रतिबंधात्मक निर्णय घेतले होते..तात्पुरता परदेशी वास्तवास असणाऱ्यांची तर अगदी 'ने मजसी ने' अवस्था होती.. जर्मनकरांमध्ये एक प्रकारचा विश्वास जाणवला मला कदाचित तो स्वतःवर, गव्हर्नमेंटवर असेल किंवा मेडिकल सिस्टिमवर..काही झालच नाही या अविर्भावात त्यांचा दिनक्रम चालू होता..आणि मी मात्र चिंता करी विश्वाची प्रमाणे..ऑलिम्पिक चालू असल्यासारखं रोज ती वाढणारी आकडेमोड बघत दिवस ढकलत होते..
तुषारचे क्लायंट विसीट्स अजूनही चालूच होते.. दीपा वहिनींना कॉल केला तर त्यांच्या घरी ही परिस्तिथी सारखीच.सतत धाकधूक.. एका सोमवारी अचानक तुषार संध्याकाळी घरी होम ऑफिस चालू झाल्याचं निरोप घेऊनच आला.थोडं हुश्श झालं आणि मी कोरोनाचे अपडेट पाहणं कमी केलं.जर्मनी मेडिकल सुविधांसाठी प्रसिद्ध आहे..पण इटलीची केविलवाणी स्थिती प्रसारमाध्यमातून वारंवार बघून आपण प्रथमदर्शी जरी दाखवत नसलो तरी मनातून थोडे हादरले होतोच. जेव्हा लॉकडाऊन मध्ये आम्ही रेवेत गेलो तेव्हा थंडी ओसरली नव्हती(तशी जर्मनी मध्ये आम्हा मुंबईकरांना कायमच वाजते म्हणा) त्यामुळे जॅकेट्सचा लवाजमा,त्यात हँडग्लोव्हज,मास्क ने आणखी भर टाकली होती..ते इवले इवले डोळे आरशात बघून कोणती मोहीम लढायला निघालोय असंच वाटलं मला..पण तिथे गेल्यावर सगळं वातावरण बघून जीव भांड्यात पडला आणि आता तर सवयीचंच झालं.सॅनिटाइझर, लॉकडाऊन, क्वारंटीन,हायड्रॉक्सीक्लोरोक्विन असे बरेच पठडीतले शब्द नव्याने कळले.
पाहिले दोन-तीन दिवस मस्त आनंदात गेले..मग दोघांनीही थोडं प्लंनिंग करून दिवस आखला कारण दिवसभर त्या लॅपटॉपवर बसून डोकं ,मन आणि शरीर वजनदार होत असल्याची जाणीव झाली होती..त्याचदरम्यान साधारण भारतातही लॉकडाऊन सुरू झालं होतं..कधीही न आलेले "हितचिंतकांचे" फोन आणि मेसेज येत होते.. बस एक छोटासा व्हारस जीसने बदलिथी सबकी दुनिया..मराठी कट्ट्याचे सोशीअल मीडियाचे अपडेट घरचे कटाक्षाने फॉलो करत होते.'आपलं माणूस' मुलांच्या सोबत आहे म्हणून एका अर्थाने निर्धास्तच होते..एखादी गोष्ट आपण करतोय तर ती 'का ' करतोय याचा विसर आपल्याला बऱ्याचदा पडतो कधी आपण ब्लाइंडली फॉलो करतो तर काही नुसतं वर्षानुवर्षे करतो.. चित्रं रेखाटतानाही आपल्या भावना त्या चित्राच्या डोळ्यात उतरवतो आपण आपल्याच नकळत.. .तसच अगदी रामरक्षे पासून विविध पारायणं.खूप प्रश्न..मग थोडी चर्चा फॅमिली कॉल मध्ये चालू झाली. अगदी सगळ्यांकडेच अमाप वेळ होता.. आणि काही अडलं तर आई बाबा होतेच. त्यात रामायण महाभारत सुरू झालं ..कधीही न ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टी त्याचे संदर्भ ,त्यावर केलेलं गूगल..डिस्कव्हरीवर त्याचदरम्यान टेलिकास्ट झालेला रिसर्च.. अनेक तर्क वितर्क ..एक विलक्षण अनुभूती येत होती.
चान्सलर मॅडमच्या प्रेस कॉन्फरेन्स नित्य नियमाने पाहू लागलो..प्राथमिक उद्देश कोरोना असला तरी जर्मन भाषा थोडी अजून अवगत करणं हा हेतू ही होता.फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बरेच कलाकार कथा, कवितांचे अभिवाचन करत होते त्याचा आस्वाद घेत होतो.व्हाट्सअँपवर ग्रुपमध्ये रोज धडकणारी नवनवीन कोडी आणि फेसबुकवरील कंमेंट्स मधली चारोळी हा ही एक मजेशीर अनुभव होता..ऑनलाइन निरनिराळ्या लेखकांची पुस्तके विनामूल्य उपलब्ध होती त्यामुळे डोक्याला खुराक सतत चालूच होता.याचदरम्यान तुषारने नकळत माझ्या साम्राज्यावर म्हणजेच किचनवर गनिमी काव्याने शिरकाव केला होता..(स्पेशिअल थँक्स : मराठी कट्टा मित्रांचे सोशिअल मीडिया अपडेट्स.रोज विविध स्टेटस,कृती,क्रमांक ,दिनांक,अतिउत्तम सादरीकरण.. मग मोहाच्या मधात पडायला होईलच ना) पण जगातले उत्तम शेफ हे अगदी बल्लवचाऱ्यांपासून सत्ता गाजवतायेत यावर पुन्हा आमच्याघरीही शिक्कामोर्तब झालं..
या होम ऑफिसमूळे नक्की काय राहून जातंय ते हळू हळू उमगत होत आणि लेख लिहित असतांनाच तुषारला म्युनीकवरून बोलवणं आलं..म्हणजे पुनश्च हृदय मी स्पंदन तू फक्त फरक एवढाच फ्रँकफूर्ट मी आणि म्युनीक तू....एका लहानश्या(डोळ्याला न दिसणाऱ्या)विषाणूने संपूर्ण जगाच्या जीवसृष्टीला वेठीस धरलंय तरीही मनुष्य मात्र 'चरैवेति चरैवेति' म्हणत आपली वाटचाल करतोय..कारण शो मस्ट गो ऑन !
अपुर्वा वाणी-अमृतकर
(apurvawani19@gmail.com)