हे ही दिवस जातील....! - अपूर्वा कुलकर्णी-पत्की - (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)
आज १८ जून २०२०!मागच्या वर्षी या दिवशी मी जर्मनीत आले.Dependant visa वर. एक वर्ष झालं आज. या एका वर्षात हे जगखर्या अर्थानं किती बदललं! त्याचं कारण अर्थातच कोरोना व्हायरस! कुठच्या देशातूनहा कोण कुठला एवढासा विषाणू आला आणि अक्षरशः होत्याचं नव्हतं व्हायला सुरुवात झाली.
सुरुवातीला'चीन मध्ये आहे नाअजून' किंवा'किती वाईट रे बाबा' अशाreactions आणिकाही व्हीडिओजwhatsapp, facebook वर बघायला मिळत होते, पण त्यांचं रुपांतर'बापरे! आपल्याएरियात एवढा काऊंट?' अशामध्ये व्हायला जेमतेम २-३ महिन्यांचाच कालावधीगेला. फेब्रुवारी, मार्च-मीड पर्यंत माझ्या जर्मन भाषा विषयाच्यावर्गातही या चर्चा रंगत होत्या. माझा एक क्लासमेट इटलीचा,एक स्पेनचातर एक फ्रेंच…असे सगळे जगाच्या वेगवेगळ्या भागातून असल्यामुळेसगळीकडच्या कोरोनाच्या बातम्या कानावरपडत होत्या. आश्चर्यकारक घटना ऐकायला मिळतहोत्या. सुरुवातीला या चर्चा आणि थोडीफार माहिती इतकंच कोरोनाचं स्वरुप होतं आणिएक दिवस मार्च १३ ला सगळ्यांना जर्मन क्लास कडून मेसेज आलाकी,१६ मार्च पासून कोरोनामुळं अनिश्चितच काळासाठीक्लास बंद राहील. सगळ्या शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस तसेच सार्वजनिक ठिकाणं बंद करण्याचाहीनिर्णय घेण्यात आलेला होता. ही परिस्थिती थोडी भयानक आहे हे जाणवायला सुरुवातझालेली होती. अनिरुद्ध म्हणजे माझा नवरा, त्याचंही‘वर्क फ्रॉम होम’सुरु होणार होतं. यातून पॉसिटिव्ह ते काय…की, आपल्याला फक्त घरी बसायचं आहे. त्यामुळं'Okay! म्हणजे आता घरीचराहून काम!WFH बरं आहे की' असा मीसुरुवातीला याकडे बघण्याचादृष्टिकोन होता. स्वयंपाक करुन क्लास ला पळा, अभ्यास करायांतून ब्रेक मिळणार होता. धावपळ होणार नव्हती. हा ब्रेक बरा वाटत होता.आठवड्यातून एकदा होणारे घरचे व्हिडीओ कॉल्स आता रोजच्या रोज होत होते. भारतात घरीजर्मनीतलं वातावरण ऐकून थोडं टेन्शन येत होतं, पण आम्ही घरीच आहे, सेफ आहे हे ऐकून तेहीरिलॅक्स होतहोते. मित्र- मैत्रिणींचे व्हिडीओ कॉल्सनित्यनेमाचे झालेलेहोते. भरपूर मोकळा वेळ असल्यामुळं वेगवेगळ्याrecipes try करणंहीसुरुच होतं. वेळ बरा जात होता.
इकडे युरोपमध्येहळूहळू कोरोनाने भयावह रुप घ्यायला सुरुवात केली. इटली,स्पेन विळख्यातसापडले होते. माझी एक मैत्रिण अमेरिका, एक सिंगापूर, काहीजणी भारतात आणि मी इथे... त्यामुळेसगळीकडच्या बातम्या कळत होत्या. काऊंट कमी होईल अशी आशा दिसत नव्हती. जसजशाबातम्या बघत होतो तसतशी परिस्थिती किती भयावह आहे हे जाणवंत होतं. सगळेचpanic झालेले दिसत होते.मी बाहेर जाणं पूर्ण बंद केलेलं होतं. बाकी युरोपियन देशांच्या मानानं जर्मनीतीलपरिस्थीती स्टेबल वाटत होती. पण दिवसातून १०वेळा बातम्या, मोबाइल वर सततयेणारे मेसेजेस, worldometer वरंचसततचं काऊंटtracking यासगळ्या भीतीचा मनावर व्हायचा तोच परिणाम झाला. सततच्या बातम्या बघून मलाही आजारीपडलेय, घसादुखतोय, BP low झालंयअसं वाटायला लागलं आणि हे कोरोना फोबियाचे परिणाम शरीरावरही दिसू लागले. डॉक्टरांनाफोन करावा की नको यात चार दिवस घालवले. घरातली कामं करायची इच्छा गेली होती. मगweakness कमीहोईना म्हणून शेवटीappointment साठी डॉक्टरांना (Houseartz) फोनकेला आणि तोडक्या मोडक्या जर्मन भाषेतappointment मिळेल का हे विचारलं. डॉक्टरांनीappointment मिळू शकणारनसल्याचं सांगितलं कारण अर्थातच कोरोना पेशंटpriority वर होते. पण ओळखअसल्यामुळे डॉक्टरांनी फोनवरच २-३ उपाय सांगितले आणिहे ही सांगितलं की, 'do not worry and avoid watching unnecessary news'. त्यानंतर “सोनारानेच कान टोचलेले बरे” हाटोमणाही नवऱ्याकडून ऐकावा लागला.
तसं इथे जर्मनीतपूर्ण लॉकडाऊन लागू केलं गेलं नव्हतं. सुरुवातीला मात्र सगळे लोकpanic झालेले असल्यामुळंआवश्यक वस्तूंचा थोडा तुटवडा जाणवला, पण नंतर गव्हरमेंटनी केलल्या आवाहनानंतरलोकांनीही त्याला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. इथे बाहेर फिरण्यावर पूर्ण बंदीनव्हती पण नियम पाळूनच लोकांनी बाहेर फिरावं असा आदेश होता. जर्मन लोक वेळपाळण्याचा बाबतीत आणि शिस्तीच्या बाबतीत किती काटेकोर आहेत हे गेल्या एक वर्षात बघितलंच होतं पण या कोरोना काळात ते जास्त जाणवंलं. एकमेकांच्या घरी जायचं नाही म्हणजे नाहीच जायचं! या काळात सरकारला आपल्यापरीनं मदत करायची म्हणजे घालून दिलेले नियमपाळायचे. बाहेर फिरतानाsocial distancing पाळणे, गरज असेल तेव्हाmaskआणिglovesवापरणे या गोष्टीलोकांकडून सहजपणे आपल्याशा केल्या गेल्या.'कोरोना का आहे?' म्हणूनवैतागण्यापेक्षाsummer सुरु झाल्यामुळेgardening, cycling, running तसेचगरजेच्या लाकडी वस्तू घरच्या घरी तयार करणेवगैरे गोष्टीत मनरमावणारे जर्मन्स मला भावले.
इकडे घरी नवर्याच्याroutine मध्येतसा फरक पडला नव्हता. तो दिवसाचे ८-९ तास ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा. मला आतापूर्ण बरं वाटत होतं पण वेळ घालवणं हळूहळू अवघड होऊ लागलं. पुस्तकं वाचायची आवडहोती पण इथे हव्या त्याhard copies मिळत नाहीत हे माहिती होतं. बरोबर आणलेली पुस्तकं केव्हाच वाचून झाली होती. मग‘किंडल’ वर वाचायचा प्रयत्न करु असं म्हणून वाचन सुरु केलं.‘सर सलामत तो पगडी पचास' या न्यायानं, आपली तब्येत ठणठणीतठेवणं गरजेचं आहे हेही मनाशीपक्कं केलं.Routine पुन्हासुरु केलं.व्यायाम,स्केचिंग, झूम वरtechnical classes, जर्मनशिकणे, होमडेकोर आणि वाचन सुरु केलं. गोष्टी थोड्या सोप्या झाल्या.
दरम्यान, मराठी कट्टाच्या अजितदादांनी एक facebook live सेशन घेतलं, ते आवर्जून attend केलं. त्यानंही कोरोनाची भीती कमी व्हायला मदत झाली. विचारकरता करता हे लक्षात यायलालागलं की mask, gloves हे आता ' new normal' होणारआहे. आपल्या घरी लहानपणी लावलेल्या सवयी पाळल्या तर हे कोरोना प्रकरण फारसं अवघडजाणार नाही.Corona or no corona, we are ready. We are proud, we survived this together!!!
शेवटी अमिताभ म्हणतो तसं “गुजर जायेगा..मुश्किल बहोत है..मगर वक़्त ही तो है..गुजर जायेगा”
अपूर्वा कुलकर्णी-पत्की
(apoorwakulkarni1990@gmail.com)