ePrivacy and GPDR Cookie Consent Script by Cookie Consent

कोरोना चा मजेशीर आतंक - अजय बिडवे (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

कोरोना चा मजेशीर आतंक - अजय बिडवे (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

स्थळ: हानाऊ जर्मनी,

काळ : साधारण मार्च चा दुसरा आठवडा

धवल च्या मुलाचा वाढदिवस, बऱ्याच दिवसांपासून गाजत होता, पण चायला दोन तीन आठवड्यापासून कुणालाच काही कळत नाहीये. चीन मधून निघालेल्या या कोरोना नि पार जीव हैराण करून सोडलाय. इटली च्या काय काय बातम्या येत आहेत, मॅडम मेर्केल धडाधडा प्रेस कॉन्फरेन्स काय घेतायत. जर्मनीत नक्की  लॉक डाऊन  लागणार बहुतेक.

येताय ना `धवल चा सकाळ पासून चार वेळा फोन आणि मेसेज, धवल आमच्या इथला पार्टी द्यायला एकदम दिलदार माणूस. या, मस्त राहा, खा, प्या एन्जॉय करा. पोरं पण खुश, रिधव च्या बर्थ डे ला रिटर्न गिफ्ट काय काय मिळणार यावर आमच्या मुलीने किमान दहा वेळा चौकश्या करून झाल्या, इमॅजिनेशन चे तारे तोडून झाले होते. ``अरे या कोरोना मुळे कसं होणार माहित नाही पण तुम्ही या नक्की. पण कम्पल्शन नाही हा´´.  ``अरे हो रे, आम्ही येऊ ´´, असे म्हणत पार्टी ला निघालो.

बरोबर चार वाजता पोहोचलो. अक्षय-अपेक्षा गिफ्ट घेऊन पोहोचलेच होते. बिल्डिंग च्या दरवाज्यावर बेल दाबली व दरवाजा उघडायला गेलो तेवढ्यात अक्षय ओरडला. ``अरे कोरोना....´´. पोटात भीती चा असा गोळा आला ना... ``अरे किधर है.. डरा राहे हो क्या...´´ मी बिचकत ओरडलो.  ``अरे डोअर पे हो सकता है....´´. `` चायला तू पण ना अक्षय..´´.  आमची पोरगी पण,  ``बाबा पण तिथे असला तर?´´.  Zum Gluck बाजूला एक सॅनिटायझर ची बाटली होती. Bitte Drucken, प्रेस करा आणि हाताला चोळा.  प्रेस केला.. कुठला काय… रिकामी…एकदम रिकामी. ``आईच्या गावात, गेला उडत कोरोना,´´ असं म्हणत फोअर आर्म नि दरवाजा उघडला व सर्व मंडळी धवल च्या दरवाज्यावर पोहोचलो. आता दरवाज्या वर पुन्हा बेल दाबा. ``या वेळेस अक्षय तुम दबाव´´, त्याने पण इनोव्हेशन दाखवत गिफ्ट च्या बॉक्स ने बेल दाबली.

धवल च स्वागत जंगी होतं, बऱ्याच दिवसांनी भेटत होतो तर हात शेक हॅन्ड करायला गेलो तर लेकाचा दोन पाय मागे सरकला. मनात आलं, हे काय?.. तर मागे सरकून पाय पुढे केला. ``हं हे काय नवीन´´. म्हणे कोरोना लेग शेक. ठीक आहे म्हटलं मी पण आपला पाय पुढे केला व सो कॉल्ड कोरोना शेक केला. अक्षय पण पुढे आला, आणि लगेच त्याने गाणे लावले ``ना नाना ना.. ऽऽऽऽऽऽ.. , ना नाना  ना  ऽऽऽऽऽऽ ´´ आणि तेवढ्यात कोरोना च्या शेक लेग चा टिकटॉक चा एक प्रयोग प्रस्तुत केला. सगळे अवाक. कुणाचे काय तर कुणाचे काय. अक्षय-धवल, लगेच ``आपण आता टिकटॉक वर टाकू, फेमस होऊ´´. ``ते असोत धवल पण तुमच्या बिल्डिंग च्या एन्ट्री ला सॅनिटायझर ठेवलाय खरा, पण डबा रिकामा आहे, हा काय प्रकार आहे´´. धवल त्यावर, ``ते ना साले सगळे भुक्कड लोक, आख्या हनाउ मध्ये फक्त आमच्याच बिल्डिंग च्या बाहेर अशी व्यवस्था आहे, मग काय येतात, फुकटचा सॅनिटायझर लावायला´´. ``अरे धवल, बाबा कुठे आहेत तुझे?´´ माझा प्रश्न. ``अरे आत्ताच पोहोचवून आलो एअरपोर्ट ला´´. ``काय??? काल तर बोललो आणि तू म्हणालास अजून एक महिन्याचा विझा आहे´´. अरे काय झालं, इथे पण कोरोना एकदम फॉर्म मध्ये येतोय, आणि इंडियात म्हणे लॉकडाऊन करतील तर बाबा म्हणाले दोन्हीकडे अडकायची रिस्क कशाला तर रात्रीच फ्लाईट रि-बुक केली आणि आजचीच मिळाली आणि गेले पण``. ``आणि वाढदिवस?´´.`` ते जाऊ देत, म्हणालो पुढच्या वर्षी करू´´. ``अरे वा´´. धवल च्या व्यावहारिक अँप्रोच चे कौतुक वाटले. ``आणि बर्थडे बॉय कुठंय?´´, तेवढ्यात बर्थडे बॉय बाहेर आला व सर्वां कडून गिफ्ट घेऊन पाप्या घेऊन व बाकीच्या पोरांना घेऊन खेळायच्या खोलीत घेऊन गेला. पोरांचं लोढणं सुटल्या मुळे आम्ही रिलॅक्स झालो.

पार्टीला हळूहळू सर्व गेस्ट लोकं जमले. वाढदिवस राहिला बाजूला विषय एकच, कोरोना का मजेशीर आतंक. प्रतिभाला म्हणे, येताना कोणीतरी रस्त्यावर माणूस दिसला होता, तो टॉयलेट पेपर चा पॅकेट हातात घेऊन चालला होता. ``किधर देखा?´´ सगळ्याचा एकसुरात प्रश्न. काऊफलॅन्ड कि रेवें ती कन्फ्युज झाली. ``बहुतेक काऊफलॅन्ड जवळ´´. काऊफलॅन्ड जवळच होता. सांगायचा अवकाश, एक दोन जण पार्टी सोडून लगेच निघाले पण .. ``आम्हाला पण एक´´, ... ``हमारे लिये भी´´. अश्या सूचना सर्व दिशेनं यायला लागल्या. आमच्या मिसेस नि पण घरी तीन पॅकेट आहेत पण मिळाला तर घेऊन ठेवा लॉक डाऊन झाला आणि टॉयलेट पेपर लागला तर अशी सूचना दिलीच. हो… हू… करत त्या बिचार्यानी जिना उतरला. दोन जण किती पॅकेट आणणार याचा हिशोब करताना मी प्रकाश कडे बघत विचारले, ``तेरेको नाही चाहिये?´´. तो माझ्याकडे आशाळभूत पणे बघत म्हणाला, ``अपना हाथ जग्गनाथ´´. यावर मला इमॅजिनेशन ची गरज पडली नाही, पण माझ्या आठ वर्षाच्या मुलीला हा रेफेरन्स लागला नाही. यावर विषय बदलावा म्हणून विचारले ``आणि तुझी बायको कुठंय?´´. ``वो इंडिया मे है´´. `` तिथे कशी काय?´´. ``छुट्टी के लिये गयी थी, अटक गयी´´. पुढच्या प्रश्नोत्तरा वर पण जग्गनाथा च उत्तर मिळेल हा अंदाज धरून पुन्हा विषय बदलला.

एवढ्यात पार्टी ला सर्वात शेवटचा मेंबर नीरज आला. आत आला तो खोकतच. सगळे टरकले. खोकल्याची उबळ रोखतच म्हणाला, ``मै सेफ हू´´. ``कैच्या काई सेफ म्हणे. केवढा खोकतोयस, कोरोना असला तर?´´ एकाच प्रश्न. अरे बहोत दिन से है, आणि ताप नाहीये´´ नीरज ची त्यावर सारवा- सारव. त्यावर गुगल युनिव्हर्सिटीत पास झालेले एक एक जण ज्ञान विरझू लागला. ``बहुतेक पोलन असेल, सध्या Birke चा जोरदार सिझन आहे, डोळे सुजतात, कान खाजतात पण ताप येत नाही हां´´. ``नॉर्मल grippe भी चल हि रहा है?´´.  ``ये grippe क्या है?´´ एका जर्मन अज्ञानी चा प्रश्न. ``अरे नॉर्मल फ्लू रे´´. तेवढ्यात एकाने Grippe ने मरायची प्रोबॅबिलिटी कोरोना पेक्षा जास्ती आहे असा स्मार्ट फोन वर बघत शोधनिबंध सादर केला. दीपक ला खूप टेन्शन आलं, पण जण ३४ वर्ष्याच्या व्यक्ती ची कोरोना ने मारायची काय प्रोबॅबिलिटी आहे यावर काहीतरी कॅल्क्युलेटर वर गणित केलं व खूप कमी नंबर आहे यावर त्याला हायसं वाटलं.

तेवढ्यात टॉयलेट च्या बाहेर गर्दी झाली, (फक्त हात धुवायला बरं). अपेक्षा हात धुवून बाहेर आली, अपेक्षा कितना टाईम हात रगडा? वीस सेकंड ना? प्रतिभा च  तेवढ्यात ``अरे मर्केलने  बोला है तीस सेकंड´´. ``हॅट यार, हे काय आहे वीस कि तीस एक काय ते सांगा´´ माझा इरिटेशन मी व्यक्त केलं. ``मै तो बीस सेकंद हि करती हू´´. ``अपेक्षा तीस सेकंद इस करेक्ट, खरा क्लिनिंग इफेक्ट वीस सेकंद नंतरच येतो´´ अक्षय अपेक्षाला  चिडवत म्हणाला.  हे चिडवणं खरा मानून बिचारी अपेक्षा पुन्हा हात धुवायच्या लाईनीत लागली.  अजून एक जण, अल्कोहोल पिले कि कोरोना होत नाही म्हणे. दीपक त्यावर, ``उसके लिये ९५% अल्कोहोल कि जरुरत है´´. दुसरा एक महाभाग. ``तो पिने का ना, उसमे क्या है. मजा का मजा और कोरोना भी दूर``. (ट्रम्प तात्यांनी हा उपाय शोधायच्या दोन महिने आगोदर हां)

अश्या प्रकारे या सर्व कोरोनाच्या गप्पांमध्ये वाढदिवस छान पार पडला. धवल ने नेहेमीप्रमाणेच छान खातिरदारी मस्त केली होती, खाद्यपदार्थ व रसवंती यांची रेलचेल होती. सर्व गप्पांचा व खाण्यापिण्याचा आनंद घेऊन आम्ही परतत होतो. परती च्या रस्त्यावर गाडीतल्या रेडिओ वर पुन्हा कोरोनच्या बातम्या लागलेल्या, मॅडम मेर्केल काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहेत….एकत्र जमू नका ….हात धुवत राहा….हे पुन्हा कानावर पडायला लागल्यावर…. गाडीत बायको चा चेहरा एकदम पडलेला. `` आपण नको जायला होतं, कोरोना झाला तर?´´

तळटीप: हि पार्टी कोरोना चे जर्मनी तील Restriction Announce व्हायच्या आगोदर झाली होती व आम्ही सर्व जण पार्टी नंतरहि श्रीकृपेने कोरोना फ्री राहिलो. व Restriction जाहीर केल्यानंतर आम्ही कोरोनाच्या सर्व नियमांचे व्यवस्थित पणे तीन  साडेतीन महिने पालन केले.

अजय बिडवे
(ajay.bidwe@googlemail.com)

Show Comments