ePrivacy and GPDR Cookie Consent Script by Cookie Consent

जर्मनीतील लाॅकडाऊनचे अनुभव - माधवी फाटक (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

जर्मनीतील लाॅकडाऊनचे अनुभव - माधवी फाटक (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

(सदर अनुभव हे मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२० साठी  माधवी फाटक यांनी स्टुटगार्ट शहरातून लिहिले आहेत)

मी माधवी फाटक. जर्मनीतील स्टुटगार्ट या शहरात माझा नवरा आणि मुलगा यांच्यासोबत राहते.

नुकतेच म्हणजे डिसेंबर २०१९ ला आम्ही भारतात जावून आलो.भारतात खुप खर्च करून (उधळून) आल्यावर मीही (इतरांसारखचं) ठरवलंहोता.आता काही दिवस तरी काटकसर करायची,म्हणजे काय ते... मिनिमलिस्टीक व्हायचं,downsizing करायचं वगैरे वगैरे( भारतातून airindia च्या कृपेने दोन दोन बॅगा भरुन आणल्या की असं व्हायचंच)

जानेवारी छान गेला फेब्रुवारीतही कामताव्यतिरिक्त बाहेर जायचे टाळल्याने Shopping चा मोह आवरलाच.पण मार्च आला आणि सगळंबदललंच.कोरोनाच्या बातम्या वाढत होत्या पण आपण इथे जर्मनीत एकदम सुरक्षित आहोत असं वाटून मी निर्धास्त होते.

११ मार्चला कामानिमित्त ट्रेनने निघाले होते.जिथे चारही सीटस् रिकाम्या होत्या अश्या जागी बसले.पुढच्या स्टेशनवर ७५-८० वर्षीच्या दोन आज्जी चढल्या आणि माझ्या पुढच्या बाकावर बसल्या. त्यातील एकीला किंचित ठसका लागला त्याबरोबर आजुबाजुच्या सर्वांनीपटापट रुमाल,स्कार्फ,पर्स असं जे मिळेल ते नाकातोंडासमोर धरले .मीही मग (पुण्यातील सवयीने) पटकन स्कार्फ तोंडाला बांधला.त्यादिवशी बाहेर पडल्यावर सतत संशयानं एकमेकांकडे बधणार्या नजरा आणि घाबरलेले चेहेरे पाहुन कोरोनाचं गांभीर्य लक्षात यायलालागलं आणि त्यादिवसानंतर आमचं लाॅकडाऊन सुरु झालं व बाहेर जाणही कमी वा बंदच झालं.

मुलाची शाळा सुरु होती पुढे  आठ एक दिवस.रोज नियमित शाळेत फोन करायचे.सगळं नीट आहे ना?शाळेत कुणी कोरोना पाॅझिटीव्ह नाही ना ?याची खात्री करूनच त्याला शाळेत पाठवायचं. शाळेकडून येणार्या १-२ जर्मन ईमेल वाचणं सहज शक्य होतं पण एके दिवशी चक्क ८ कोरोना संदर्भातील ईमेलस्  आणि त्याही जर्मनमध्ये!!! अजून डोकं दुखतयं!!!

पहिले दोन आठवडे घराच्या दरवाज्याचं बाहेरील हॅंण्डलला चुकून जरी हात लागला तरी ३वेळा “happy birthday” म्हणत हात धुवायचे.दररोज लिफ्टचे बटणस् ,हॅंण्डलस् ,दरवाजे सॅनिटाइज करायची सवय लागली.entrance lobby तिल चप्पलचा स्टॅण्ड  घराबाहेर हकलला.मुलाला सोपं

जावं म्हणून lobby मधील गणपतीच्या फोटोशेजारी to do ची लिस्ट लागली.

हा सगळा पाॅझिटिव्ह बदल होता (कोरोना )निगेटीव्ह राहण्यासाठी.”आपलं काम भलं आणि आपण भलं “म्हणताना “चिंता करतोविश्वाची “हा बदल कसा झाला हे कळलचं नाही.

कधी नव्हे ते सगळं कुटुंब एकत्र होतं आणि कुटुंबातील जे दूर होते ते  व्हिडीओ काॅलस् मुळे जवळ येत होते त्यामुळे मनही एकदम खुश होतं पण मनाला छान वाटलं की (पोटाच्या)पोटात दुखतचं आणि ते रोज नवीन नवीन पदार्थांची मागणी करु लागलं.मग डालगोना काॅफीनंसुरु केलेला प्रवास रवा केक,बटाटेवडा ,लादी पाव करत how to keep your kitchen clean and untouchable वर येऊन थांबला.स्वयंपाकघरात दोन तासापेक्षा जास्त वेळ न घालवणारी मी दिवसातला निम्मा वेळ स्वयंपाकघरात आणि निम्मा कोरोनाच्या updates घेत घालवू लागले. whatsapp वरचे उपदेश ‘काय करावं,काय खावं  किती झोपावं किती व्यायाम करावा वगैरे ‘याचं रोज पारायण सुरु झालं.डोळ्यांचा आणि हाताच्या  बोटांचा मुख्यत्वेकरून उजव्या अंगठ्याचा वापर खूपच वाढला.(डोळ्यांना चष्मा साथ देईलही पण आंगठ्याचं काय???)म्हणून व्यायाम,प्राणायाम,करायला सुरवात केली. १०१ सुर्यनमस्काराचं चॅलेंज स्विकारलं.एक दिवस म्हणतां म्हणतां १२ सुर्यनमस्कार घातले पण ,मग सुर्यालाच किव आली आणि तो म्हणाला “ बस कर पगली ! रुलायेगी क्या?मग साडी  चॅलेंज,couple चॅलेंज ,१०० happy days चॅलेंच सगळं स्विकारलं.

नंतर लक्षात आलं कि हे   सगळं करताना बाकीचे तर happy आहेत पण आपण मात्र साड्या बदलतं,फोटो काढत ,फोटो शोधत आणि recipes करत राबतोय आपले!!

आपण केलेले सगळे plans आपल्या नजरेसमोर चौपट होताहेत हे पाहतांना खुप वाईट वाटत होतं.

सुट्टीचे तर सगळे plans बारगळले होते.गेल्या काही वर्षांत केलेले प्रवास,summer winter म्हणत केलेली shopping हे वारंवार आठवतं होतं.मग लगेच fb,insta वर त्या आठवणी “missing those days” म्हणत पोस्ट करत होते. अश्या परिस्थितीत शारीरिक स्वास्थ्यासोबत मानसिक स्वास्थ्य जपणं खुप महत्वाचं होतं. Family time  म्हणत २४ तास एकत्र राहणे तसं सोप्पं नव्हतं.मग दिवसातला काही वेळ तरी प्रत्येकानं आपापला एकटा घालवायलाहीशिकलो.

सकाळी उठल्यावर coronazähler वरचा  आकडा (शेअर्स मार्केटच्या आकड्यांसारखं) बघणं नित्याचं झाल.मग worldometer वरभारताचा नंबर कितवा हे त्यासोबत आलचं.इथे परिस्थिती कितीही गंभीर असली तरीही काळजी वाटायचो ती भारताची.

Walk ला बाहेर केल्यावर इकडे १-१ किमी वर पण माणुस दिसत नव्हता तरी हे हाल होते मग भारतात social distancing कसं शक्य होईल याचीच चिंता वाटायची.दिवस भीतीदायक होत होते.

इथे लोक बरेच सतर्क आहेत.आपण नेहमीच पाश्यात्य संस्कृतीबद्दल नावं ठेवत असतो पण lockdown च्या काळात सरकारने घातलेलेनियम अतिशय काटेकोरपणे पाळलेत यांनी.त्यांच्याही दैनंदिन जीवनात खुप बदल झालाय पण त्याच्याबद्दल नापसंती दाखवण्यासाठीनियमबाह्य गोष्टी केलेल्या इकडे आढळल्या नाहीत.

एके दिवशी बिल्डींगच्या मुख्य दरवाज्याशी एक ९५ वर्षाचे आजोबा पडलेले पाहिले.पटकन जावून त्यांना उचलून बसवलं.त्याच्या डोक्याला मार लागला होता ,खुप रक्त येत होतं.डोक्याला रुमाल लावून एका हातांनं डोकं तसचं धरुन ठेवलं आणि दुसर्या हातांना ते पडूनयेत म्हणून त्यांना धरुन ठेवलं होतं.

११२ ला फोन कसा लावायचा हे डोक्यात असताना एक ग्रृहस्थ तेथे आले व पटकन त्यांनी फोन लावला. आजोबांना बोलतं ठेवण महत्वाचं होतं.अवघ्या १५ मिनिटात krankenwagen हजर झाली. त्यातिल डाॅक्टरांनी आजोबांची चौकशी केली तुम्ही ईटलीला गेला होता का? तुम्हाला ताप किंवा खोकला आहे का? आणि क्षणात माझी ट्युब पेटली. इतका वेळ कोरोना वगैरे सगळं विसरुनच गेले होते मी!!डाॅक्टर मदत केल्याबद्दल  मला धन्यवाद म्हणाले पण मी पुर्णपणे घाबरले होते.

त्या दिवशी २-३ वेळा आंघोळ आणि ७-८ वेळा हात धूणं झालं.मग “निस्वार्थपणे मदत करणे महत्वाचं होतं ते तु केलसं”असं म्हणत स्व:ताला समजावले. आता जवळजवळ ३ महिने झाले.कोरोनाच्या बातम्यांची पण आता सवय झालीये.कोरोना होऊ नये म्हणून धडपडण्यापेक्षा आता कोरोना झाला तर काय याची उत्तरं शोधायला हवीत.

हे असं किती दिवस चालणार म्हणत देवाला दुषणं दएण्यापेक्षा ‘देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश ‘म्हणत त्याचे आभारमानावयास हवेत आणि मनाला positiv करत कोरोना ला negative करुन ,संपवायलाच हवयं.

माधवी अंबरिष फाटक,
स्टुटगार्ट, जर्मनी
(panmadhavi@gmail.com)

Show Comments