ePrivacy and GPDR Cookie Consent Script by Cookie Consent

नववधू आणि कोरोना - अश्विनी पवार (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

नववधू आणि कोरोना - अश्विनी पवार (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)

लग्नाच्या स्वप्नातून जेव्हा जागी झाले तेव्हा स्वप्नातही येणार नाही अशी काहीशी परिस्थिती डोळे उघडल्यानंतर समोर आली .
डिसेंबर मध्ये लग्न झालं, जर्मनी ला यायची तयारी सुरु झाली . जर्मनीची नोकरी हातात होती, व्हिसाही लवकर झाला. आता फक्त जर्मनीला यायचा प्रवास बाकी होता. इकडे येऊन नव्याने संसार सुरु करायचा, नवीन culture अनुभवयाचे, अश्या छोटया-मोठया स्वप्नांनासोबत प्रवासाचा दिवस उजाडला.

२८ जानेवारी , रात्री १० ची flight होती मुंबईहून. सकाळी अगदी नेहमी प्रमाणे नवीन पप्पांना (सासरे) चहा दिला आणि ते पेपरमधील एक बातमी दाखवत म्हणाले
"चीनमध्ये कोरोना वाढतोय..जाताना विमानतळावर मास्क घ्या नक्की " मीही होकारार्थी मान हालवली आणि बाकीच्या कामाला लागले. त्यावेळी मला कोरोनाच्या त्या बातमीचं गांभीर्यच न्हवतं.
आणि आम्ही मुंबई एअरपोर्ट ला पोहचलो. सगळयांचा निरोप घेऊन अगदी पाणावलेल्या डोळयांनी एअरपोर्ट मध्ये प्रवेश केला. मी मात्र अजून माझ्याच विश्वात होते. आपण दूर जाणार आहोत दीदी, अण्णा, मम्मी-पप्पांपासून वगैरे..वगैरे..
माझ्या नवऱ्याला मात्र सगळी जाणीव होती आणि cross check करावं म्हणून त्याने Immigration ऑफिसर ला विचारलं, "मास्क घालणे अनिवार्य आहे का?" त्यावर अगदी त्या अधिकाऱ्याने सहजच उत्तर दिलं, "नाही, कुठे कोरोना आणि कुठे काय.. आपल्याकडे नाहीये हा virus.. तुम्ही without मास्क जाऊ शकता." आणि आम्ही दोघेही निवांत झालो आणि नव्या जीवनाच्या पहिल्या परदेशी प्रवासाचा श्री गणेशा झाला.

जर्मनीत आल्यानंतर अगदी प्रत्येकाची जी situation असते अगदी तशीच माझी काहीशी होती... मग त्यात घर शोधणं , जॉब जॉईन करणं , सिटी रेजिस्ट्रेशन करणे, health इन्शुरन्स.. अश्या बऱ्याच गोष्टी पटापट घडत गेल्या आणि जर्मनीमधील एक महिना बघता बघता सरला. माझा नवरा (दिग्विजय ) आणि मी वेगवेगळ्या सिटींमध्ये राहतो त्यामुळे आमचं फक्त weekend लाच भेटणं व्हायचं.

मी distance learning च्या अंतर्गत post - graduation करत असल्या कारणाने माझी परीक्षा होती दुबईला मार्च महिन्यामध्ये. म्हणून मी आणि दिग्विजयने छानसा प्लॅन केला. परीक्षा देऊ आणि मग मस्त दुबई पण फिरू. सगळं अगदी ठरल्याप्रमाणे घडत होतं. ऑफिस मध्ये नुकतीच बातमी आली कि overseas travelling has been freezed. पण तरीही HR कडून exception मिळालं ट्रॅव्हलसाठी आणि सुट्टी approve झाली.. तिकीटही बुक झालं.. दुबईला रहायची सगळी व्यवस्थाही झाली.. सगळं अगदी प्लॅनप्रमाणे सुरु होतं. दिग्विजयही बॅग भरुन माझ्या सिटीमध्ये आला जायचं म्हणून. जायच्या २ दिवस आधी news आली कि आमची दुबई flight cancel झाली आहे..आणि परीक्षाही पुढे ढकलली आहे. आणि या सोबतच आमच्या दुबईच स्वप्नही postpone करावं लागलं .
प्लॅन जरी postpone झाला होता तरी मी मात्र खुश होते..कारण आता वर्क-फ्रॉम-होम मिळणार होतं.. लग्नानंतर थोडं निवांत रहायला मिळणार होतं. आणि अश्या अगणित कारणांमुळे मी खूप खुश होते.
- स्वयंपाकघरात रोज नवीन नवीन पदार्थ बनविणे .
- आत्ता पर्यंत कधीच न केलेली गोष्ट म्हणजे 'Exercise' ती अगदी नियमित पणे सुरु केली .
- मला वाचनाची आवड मग Storytel , AudioBites apps वरून पुस्तकं ऐकणे.
- मैत्रिणींसोबत गप्पा करणे .
-Youtube वर नवं-नवीन व्हिडिओ करणे

असं बरंच काही शिकवलं कोरोनाने. कधी-कधी अगदी मरगळही यायची आणि वाटायचं की काय हे..फक्त घर आणि घर.. घरात बसून बसून आणि सोशल मीडियावर वेळ घालवून कंटाळवाणं वाटत होतं .

पण दिवसाच्या एका सुंदर संध्याकाळी, हातात चहा घेऊन जेव्हा मोकळ्या आकाशाकडे जेव्हा पाहते तेव्हा मनात कोरोनाबद्दल विचार येतो तेव्हा नक्की वाटतं की, माणसाला असा reset असायलाच हवा. म्हणजे आजच्या इतक्या या धावपळीच्या जगात आईला तिच्या स्वतःच्या लेकरासाठी वेळ मिळतो जो कि तो तिला नॉर्मल जीवनात कधीच काढता येत नाही. रोज घरकाम करणाऱ्या काकूंना थोडा आराम मिळतो आणि परत एकदा आईच्या हातच्या स्वयंपाकाची चव कोरोनामुळेच अनुभवता आली सगळ्यांना.
माणसाला reset हवा पण तो कोरोनामुळे नको इतकंच वाटतं .
माझ्या अनुभवाविषयी शेवटी इतकंच म्हणेन

तू न थकेगा कभी,
तू न थमेगा कभी,
तू न मुड़ेगा कभी,
कर शपथ! कर शपथ! कर शपथ!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

आपणही कोरोनाचा असाच सामना करूयात आणि एका नवीन युगाला सुरुवात करूया.

Show Comments