पुण्यात राहून इतिहास वाचलाच नाही तर इतिहास जगलो.आणि त्या इतिहासातलं सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आयुष्यात जिथे कुठे गेलो हे सोनेरी पान नेहमी माझा सोबत घेऊन गेलोय.
It was 21st Century, humans were planning colonies on Mars, I was exploring new age technologies like Machine Learning, Artificial Intelligence in one corner of the planet and a virus came and challenged the whole humanity questioning their status of dominant species on Earth. आजच्या या कठीन काळाचं वर्णन करायचं झालं तर ते काही असच होईल.
अशा या कठीण काळात मी परदेशात आज जवळपास ३ महिने काढले.या ३ महिन्यात जगातल्या अनेक सामान्य माणसाप्रमाणे मलाही खूप प्रश्न पडले, अनेक वेळा धीर खचला, कितीही 'Mature' बनायचं प्रयत्न केला तरी "Stay Home" म्हंटल्यावर घरची आठवन यायचीच. अशा या प्रसंगात कमवलेला आत्मविश्वास, साठवलेले आदर्श आणि घरचांचे आशिर्वाद यांनी एक वेगळंच बळ धीलं.
मागील काही दिवस इकडे जर्मनीत ढगाळ वातावरण आणि सतत पाऊस चालू आहे. महाराष्ट्रातही 'निसर्ग' कोसळतोय.अशा वातावरणात माझा खोलीतल्या मंद प्रकाशात आणि युरोपचा प्रचलित शांततेत मी श्रीमान योगी ही शिव कादंबरी उघडली. अनेकदा वाचली असली तरी त्यातलं कोणतही पान उघडलं की इथे माझा खोलीत मला शिवरायांच अस्तित्त्व जाणवतं.त्यांची प्रत्येक झुंज आठवते. शिवरायांन बद्दल वाचताना त्यांच्या कर्तृत्ववान , कणखर हातांचा स्पर्श पाठीवर जाणवतो.डोळे मिटून त्या स्पर्शाने पाठीवरील महाराजांच्या हातातल्या रत्नजडित अंगठ्या मोजता येतील एवढा खरा तो अनुभव.त्या दैविक स्पर्शाच्या अनुभवाने डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा येतो. शिवराय जणू काही इथे जर्मनीत माझा सोबत बसून मला त्यांची प्रत्येक झुंज आणि कठीण प्रसंगांचे अनुभव सांगतात.शिवरायांची रयते साठीची झुंज ऐकून मला माझी वयक्तीत झुंज अगदी शुल्लक वाटते.
अफजलखानाचा प्रतापगडा भौती घेराव, सिध्दी जोहर चा पन्हाळगडा भौती वेढा, लाल महालात शाहिस्तेखान, मिर्झा राजे आणि पुरंदरचा तह, आग्र्यातील कैद या सर्व प्रसंगा समोर शिवराय धीर, धैर्य आणि बुद्धीचा जोरावर लढले.हा शिवइतिहास ऐकून मला Lockdown हा शब्दच छोटा वाटतो.
६ जून १६७४, राजे छत्रपती झाले.मराठी तख्त उभ राहिलं.त्या ऐकतीहासिक दिवसाचा आजही लोकांना अभिमान आहे, कौतुक आहे आणि माझा सारख्या अनेक मावळ्यांना प्रेरणा देणारा हा सोनेरी दिवस आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा चरणी मानाचा मुजरा !
|| मनात पुजिन रायगडा ||
Tanmay Dhimate,
(http://www.tanmaydhimate.com/blogs/)